chain snatching crime mumbai sakal
मुंबई

Navi Mumbai: फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले आजोबा अन् दोघा चोरट्यांनी साधला डाव

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ८९ वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचून पलायन केल्याची घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी वाशी सेक्टर-२८ मध्ये घडली. वाशी पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.


या घटनेतील तक्रारदार वल्लभदास शहा (८९) हे कोपरखैरणे सेक्टर-११ भागात राहण्यास आहेत. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते.

दरम्यान, ते चालत वाशी सेक्टर-२८ मध्ये आले असता विजय डेअरीसमोरून रस्ता ओलांडून जात असताना भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारुंनी वल्लभदास यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचून पलायन केले.

या घटनेनंतर वल्लभदास यांनी नातेवाईकांसह वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात लुटांरुविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT