crime.jpg 
मुंबई

विकृती! प्राण्यांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या भाजीवाल्याला मुंबईतून अटक

दीनानाथ परब

प्राण्यांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या एका 65 वर्षीय विकृत भाजी विक्रेत्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. एफआयआरची नोंद झाल्यानंतर या भाजी विक्रेत्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या BAR या स्वयंसेवी संस्थेने आरोपीविरोधात व्हिडिओ रेकॉर्डिंगचेही पुरावे दिले होते. "BAR च्या आमच्या एका स्वयंसेवकाने आरोपीचे व्हिडीओ रेकॉर्डींग केले. आरोपी श्वानांना निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. मला हा व्हिडिओ पाठवल्यानंतर मी लगेच अंधेरी डिएनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात FIR नोंदवला. आरोपीला आपल्या कृत्याबद्दल कुठलाही पश्चाताप नाहीय. उलट त्याने बिनधास्तपणे गुन्ह्याची कबुली दिली. मी प्राण्यांना खाऊ घालतो व काही वेळा त्यांच्याबरोबर लैंगिक चाळे करतो असे सांगितले." BAR चे संस्थापक विजय मोहनानी यांनी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.  

"पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे मी आभार मानतो. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले व स्थानिक पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. आरोपीने अशाच पद्धतीने आणखी काही प्राण्यांनाही लक्ष्य केले असण्याची भीती आहे" असे एनजीओच्या कायदेशीर प्रमुख गीतन दुदानी यांनी सांगितलं. 

आरोपीला स्थानिक कोर्टात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. आयपीसीच्या कलम 377, 429 अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. आरोपी अंधेरी पश्चिमेला गिलबर्ट हिल येथे रहायला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT