Vegetables Rate Due to rains prices of vegetables increased mumbai sakal
मुंबई

Vegetables Rate : पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले

आवक कमी; किरकोळ बाजारात कोथिंबिरची जुडी शंभरीपार

सकाळ वृत्तसेवा

वाशी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसाचा फटका भाजीपाल्यांना बसला असून भाज्या भाव कडाडले आहेत. पावसामुळे आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात कोथिंबिरीची जुडी पन्नास ते साठ रुपयांपर्यत आहे; तर किरकोळ बाजारात हीच जुडी शंभरीपार गेली आहे. किरकोळ बाजारात मेथीची जुडी ५०; तर शेपू ३० ते ४० रुपयांपर्यत गेली आहे. त्यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. पितृ पक्ष सुरू असल्यामुळे भाज्याची मागणी ही वाढली आहे; पण आवक नसल्यामुळे दरात वाढ झालेली आहे.

मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान परिणामी त्यांची आवक पन्नास टक्क्यांवर आली आहे. फ्लॉवर, शिमला मिरची, फरसबी, गवार, भेंडी या भाज्यांनी किरकोळ बाजारात किलोमागे शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. काही दिवसांपूर्वी फ्लॉवर, शिमला मिरची, फरसबी, गवार, भेंडीचे दर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये होते. सध्या किरकोळ बाजारात त्यांचे प्रतिकिलो दर १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत. ऐन पितृपक्षात भाज्या कडाडल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे अर्थगणित बिघडले आहे. पावसामुळे पालेभाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली, असे भाजीविक्रेते आनंदा बोऱ्हाडे यांनी सांगितले.

सततच्या पावसाचा फळांनाही फटका

पावसाचा हंगामी फळांनाही फटका बसलेला आहे. सततच्या पावसाच्या तडाख्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात फळांच्या गाड्या कमी दाखल होत असल्याने आवक कमी होत आहे, अशी माहिती व्यापारी अशोक उंडे यांनी दिली आहे. सध्या डाळिंब किरकोळ बाजारात १०० ते १५० रुपये किलोने मिळत आहे. सीताफळ किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने मिळत आहे. चिकू ३० ते ३५, संत्री ५० ते १००, हिमाचलचे सफरचंद ५० ते १७० रुपयांनी घाऊक बाजारात मिळत आहे.

मसाल्यातून कोथिंबिर वजा

कोथिंबिरीची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. किरकोळ विक्रेत्यांनी हिरव्या मसाल्यातून कोथिंबिरीला वजा केले आहे. ५० ते ६० रुपयांना विकली जाणारी जुडी सध्या १२० ते १५० रुपयांना विकली जात आहे.

किरकोळ बाजारातील दर (प्रतिकिलो)

भाज्या आधीचे सध्याचे

फ्लॉवर ७० ते ८० १०० ते १२०

शिमला मिरची ६० ते ८० १००

फरसबी ६० ते ८० १०० ते १२०

कोबी २० ते ३० ४० ते ५०

गवार ८० ते १०० १२० ते १६०

भेंडी ६० ते ८० १००

लाल भोपळा २० ते ३० ४०

टोमॅटो २० ते ३० ४० ते ५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

Nagpur Crime: नागपूर हादरलं! गरोदर महिलेचा खून करुन रस्त्याच्या कडेला फेकलं; 'अशी' उघडकीस आली घटना

Viral: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याचे लाजिरवाणे कृत्य, रुग्णाला बिस्कीट दिले, फोटो काढला अन् परत घेतले, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: गरोदर महिलेचा खून करून फेकले रस्त्याचा कडेला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर..

SCROLL FOR NEXT