Dombivli News  Sakal
मुंबई

Dombivli News : मोटार सायकल चोर अटकेत; कल्याण गुन्हे शाखेने 5 मोटारसायकली केल्या हस्तगत

कल्याण गुन्हे शाखेने त्याला अटक करत त्याच्याकडून 1 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 5 मोटारसायकली हस्तगत केल्या

शर्मिला वाळुंज

Dombivli News - मोटार सायकल चोरी करुन तो अंबरनाथच्या दिशेला निघाला होता. मात्र कल्याण गुन्हे शाखेने काटई नाका येथेच त्याला अडवून बेड्या ठोकल्या आहेत. निरज चौरासिया (वय 19) असे अटक आरोपीचे नाव असून तो अंबरनाथ येथे राहणारा आहे.

कल्याण गुन्हे शाखेने त्याला अटक करत त्याच्याकडून 1 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 5 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

अंबरनाथ येथे राहणारा निरज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महात्मा फुले चौक, विष्णूनगर पोलिस ठाण्यात मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सोमवारी कल्याण गुन्हे शाखेचे पोलिस हे काटई परिसरात पेट्रोलिंग करत होते.

दरम्यान पोलिस हवालदार विश्वास माने यांना एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली. काटई परिसरात एक अनोळखी इसम हा चोरीची मोटार सायकल घेऊन उभा आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार,

सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, बालाजी शिंदे, विलास कडू, बापुराव जाधव, मिथून राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे यांच्या पथकाने काटई गाव येथील काटई नाका परिसरात सापळा रचला.

तेथून काळ्या रंगाच्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीसह एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता सदर मोटार सायकल त्याने महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतून चोरी करुन आणल्याची कबुली दिली.

गुन्हे शाखेने यासंबंधी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेस मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आणखी चोरीच्या चार दुचाकी आढळून आल्या.

पोलिसांनी 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निरज याच्यावर महात्मा फुले चौक तसेच विष्णूनगर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपासासाठी निरज याला महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT