versova beach sakal
मुंबई

Mumbai News : वर्सोवा नौका दुर्घटना; बेपत्ता मच्छीमाराचा सापडला मृतदेह

अंधेरीच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्या लगतच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांची बोट बुडून तीन जण बेपत्ता झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अंधेरीच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्या लगतच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांची बोट बुडून तीन जण बेपत्ता झाले होते. या घटनेत बेपत्ता झालेला तिसऱ्या मच्छीमार उस्मानी भंडारी याचा मृतदेह मंगळवारी सकाळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर सापडला. शनिवारी रात्री घटना घडल्यानंतर या पूर्वी इतर दोन मच्छीमारांचे मृतदेह यंत्रणांना शोधकार्यात मिळाले होते.

वर्सोवा भागातून 5 ऑगस्ट शनिवारी रात्री 8 च्या सुमारास मासेमारी करण्यासाठी 3 मच्छीमार नौका घेऊन समुद्रात गेले होते. परंतु दुर्घटना घडत या तिघांची नौका समुद्रात ही बोट बुडाली.त्यानंतर कसे बसे करत नौकेत असलेले विजय बामणिया यांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. मात्र अन्य 2 मच्छीमार बेपत्ता होते. या घटनेनंतर अग्निशमन दल व इतर यंत्रणांनी बेपत्ता मच्छीमारांचे शोधकार्य सुरू केले.

अखेर बेपत्ता झालेल्या दोघांपैकी विनोद गोयल यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी जुहू चौपाटीवर आढळला. तर उस्मानी भंडारी याचा मृतदेह मंगळवारी सकाळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर सापडला. उस्मानीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC News : कामचुकार अधिकाऱ्यांना घरी बसविणार : आयुक्त नवलकिशोर राम

BCCI अफगाणिस्तानसोबत! पाकिस्तानच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या तिन्ही क्रिकेटपटूंबद्दल व्यक्त केला शोक

Pune City: पुण्यातली दुरवस्था बघून आयुक्त संतापले; सहाय्यक आयुक्तांची केली उचलबांगडी, तिघांचं निलंबन

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये निवडणुकीआधी 'I.N.D.I.A' आघाडीला मोठा झटका!, आता ‘या’ मित्रपक्षाचाही स्वबळाचा नारा

Latest Marathi News Live Update : वसई, विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फुटली

SCROLL FOR NEXT