maharashtra corona 
मुंबई

कोरोना संदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी, महाराष्ट्राची लवकरच होणार कोरोनातून मुक्तता?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा जरी 52 हजाराच्या वर आणि मृत्यूच्या आकडा 1627 च्या वर गेला असला तरी रुग्ण दुपटीचा वेग 14 दिवसांवर आला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग कमी करण्यात यश आले आहे. 

राज्यात सध्या 35 हजार 178 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 9 मार्चपासून आतापर्यंत 52 हजार 667 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 15 हजार 768 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने राज्यात 3 दिवसात रुग्ण दुप्पट होत होते. रुग्ण वाढीचा हा दर 3 दिवसांवरुन 14 दिवसांवर आणण्यास यश मिळाले आहे. लोकांमधील जागरुकता आणि लॉकडाऊनमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविणे शक्य झाले आहे.

राज्यात टेस्टींग, ट्रेसींग आणि आयसोलेशन या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला. राज्यातील रेड झोन तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये सरकार विशेष लक्ष देत आहे. राज्यात सर्वेसाठी विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. या सर्वेक्षण पथकांची संख्या दिवसांगणीक वाढत असून सध्या 16 हजार सर्वेक्षण पथक कार्यरत असून 66 लाख लोकांचे आतापर्यंत सर्वेक्षण झाले आहे.

कॉन्टॅट ट्रेसींगवर भर
राज्यात कॉन्टॅट ट्रेसींगवर भर दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये यश मिळाले आहे. यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तसेच अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. यामुळे रुग्णांना क्वारंटाईन किंवा आयसोलेशन सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करणे सोपे झाले आहे. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही वाढले आहे. राज्याचा मृत्यूदर एप्रिलमध्ये 7.6 एवढा होता. तो आता 3.25 टक्के इतका खाली आला आहे.

11 तज्ज्ञ डॉक्टरांचे कृतीदल
कोरोनावर उपचारासाठी 11 तज्ज्ञ डॉक्टरांचे कृतीदल नेमण्यात आले आहेत. त्यांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला. तो सर्व जिल्ह्यांना देखील पाठविण्यात आला. हे डॉक्टर्स 24 तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकतात.

very comforting news regarding Corona, Maharashtra will be free from Corona soon?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT