मुंबई

मुंबई CSMT स्टेशनचा लवकरच होणार मेकओव्हर, स्टेशन दिसणार विमानतळासारखं...

सुमित बागुल

मुंबई : आता तुम्हाला CSMT स्टेशनवर आल्यावर विमानतळावर आल्यासारखं वाटेल कारण मुंबईतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनचा लवकरच पूर्णपणे कायापालट होणार आहे. देशातील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन हे पाहिलंच असं स्टेशन आहे जे PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलद्वारा रिडेव्हलप करण्यात येणार आहे. महत्तवाची बाब म्हणजे CSMT स्टेशनच्या बाहेरील भागातीळ हेरिटेज लूक कायम ठेवून आतील भागात अद्ययावत सोईसुविधा देण्यात येणार आहेत. 

CSMT स्टेशनचा लवकरच कायापालट होणार आहे. स्टेशनच्या बाहेरील हेरिटेज लूक कायम ठेऊन स्टेशनच्या आतमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. PPP मॉडेलवर आधारित या प्रकल्पात रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्स, स्वयंचलित जिन्यांसोबत फूट ओव्हर ब्रिज, नवीन कार्यालये, मॉल, फाईव्ह स्टार प्लाझा आणि हॉटेल, सध्याच्या वेटिंग भागापेक्षा तब्बल दुप्पट मोठं वेटिंग लाउंज याचा यामध्ये समावेश होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे स्टेशनच्या २४ मीटरच्या उंचीला यामध्ये कोणताही धक्का पोहोचणार नाही. 

भारतीय रेल्वे बोर्डाने याबाबतच्या मास्टर प्लॅनला मान्यता दिली आहे. IRSDC म्हणजेच इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा प्रकल्प अंमलबजावणीसाठी लवकरच हाती घेणार आहे. PPP मूल्यांकन समितीकडे याबाबतचे सर्वाधिकार आहेत. या समितीमध्ये गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. त्यामुळे PPP मूल्यांकन समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर खासगी कंपन्यांकडून (Request for qualification - RFQ ) पात्रता विनंती अर्ज काढले जातील अशी माहिती आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार लोहिया यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाला दिली आहे.  

मुंबई छत्रपती शिववजी महाराज टर्मिनस सोबतच मुंबईतील आणखी काही स्टेशन्सचा कायापालट होणार आहे. यामध्ये  ठाकुर्ली, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, अंधेरी, वांद्रे आणि बोरिवली या स्टेशन्सचा यामध्ये समावेश आहे. ठाकुर्ली स्टेशनच्या मास्टरप्लॅनवर सध्या काम सुरु असून इतर स्टेशनच्या संकल्पित प्रकल्प योजनेचं काम पूर्ण झालंय.     

कोरोनापूर्वी CSMT स्टेशनवरून तब्बल एक हजार उपनगरीय गाड्या आणि शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत होत्या. या स्टेशनवरून तब्बल पाच ते सहा लाख नागरिक दररोज प्रवास करत होते. 

very soon mumbi CSMT station will look like highend mumbi airport with latest infrastructure

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT