Dr. ujwala chakradeo sakal
मुंबई

Dr. Ujwala Chakradeo : कुलगुरू डॉ. चक्रदेव यांचा कर्नल मानद पदवीने होणार सन्मान

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांचा केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना(एनसीसी)मार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या अत्यंत सन्मानाची मानद कर्नल स्तरावरील पदवी प्रदान केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांचा केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना(एनसीसी)मार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या अत्यंत सन्मानाची मानद कर्नल स्तरावरील पदवी प्रदान केली जाणार आहे. यासोबतच भारतीय डॉक्यूमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशनमार्फत दिला जाणारा 'भारतीय संस्कृती संरक्षण सम्मान' ही सन्मानाची पदवीही त्यांना प्रदान केली जाणार आहे. शुक्रवारी, २६ जुलै रोजी, दुपारी २ वाजता, विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलातील पाटकर सभागृहात यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्नल ही मानद पदवी कुलगुरू डॉ. चक्रदेव यांना प्रदान केली जाणार आहे. यावेळी विद्यापीठात एससीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे खास संचालनही आयोजित केले जाणार आहे. तर या विशेष कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व विभागाचे अधिष्ठाता, प्राध्यापकांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना रूजवत कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी विद्यार्थ‍िनी कल्याण आणि त्यांच्या विकासासोबतच मुलींच्या उच्च शिक्षणासासाठी यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात एसएनडीटी विद्यापीठात अनेक प्रकारचे चांगले बदल झाले असून राज्य स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या समूह विद्यापीठ आदी समित्यांचे त्यांनी प्रमुख पद भूषवले आहे.

तर एनईपीच्या अंमलबजावणीसाठी राज्यात पहिल्यांदा एसएनडीटी विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्याचा विक्रमही त्यांच्या नावे नोंदविण्यात आला आहे. तर दुसरीकडे भारतीय संस्कृतीच्या वारशाचे जतन करण्यासोबत भारतीय प्राचीन मंदिरांची परंपरा आणि त्यांचे महत्व विशद करणारे अत्यंत मोलाचे संशोधन त्यांनी केले आहे. त्यांचा नुकताचे 'टेम्पल ऑफ भारत' हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला असून त्याचा गौरव हा दोन मानद पदव्याच्या निमित्ताने होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT