Mantralaya Dance Video
Mantralaya Dance Video Esakal
मुंबई

Mantralaya Dance Video: कामाच्या वेळेत मंत्रालयात महिला कर्मचाऱ्यांचा डान्स? विरोधी पक्ष नेत्यांची टीका, व्हिडीओ व्हायरल

अंकिता खाणे (Ankita Khane)

संपुर्ण राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातून चालतो त्याच मंत्रालयामध्ये महिलांच्या डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील आहे, आणि ज्या महिला डान्स करत आहेत त्या महिला प्रशासनाच्या कर्मचारी असल्याचं बोललं जात आहे, मात्र या व्हिडीओबाबतची आणखी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मंत्रालय हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र आहे, राज्यभरातील सामान्य नागरिक आपली कामे घेऊन मंत्रालयात येत असतात. मात्र, अनेकदा कामे होत नसल्याची तक्रार सामान्य नागरीक करत असताता. तरजी कामे होतात ती विलंबाने होतात, एका कामासाठी नागरिकांना सतात मंत्रालयाचे हेलपाटे घालावे लागतात अशा तक्रारी सर्वसामान्य नागरिकांकडून वारंवार करण्यात येते.

मात्र, या ठिकाणी महिला कर्मचारी मंत्रालयात कामाच्या वेळेत, चक्क डान्स करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता मंत्रालय प्रशासन दखल घेणार का? या प्रकरणी राज्य सरकार कारवाई करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर ज्या महिला डान्स करत आहेत, त्या कर्मचारीच आहेत का? याबाबत माहिती नाही.

तर याबाबत प्रतिक्रिया देताना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 'मंत्रालय हे लोकांचं काम करायचं ठिकाण आहे. तिथं नाचगाणं चुकीचं आहे असं म्हटलं आहे. त्याचबरोबर नाचगाणं करावं हा प्रत्येकाचा ‌वैयक्तीक अधिकार आहे. पण, मंत्रालय ‌हे नाचगाणं करण्याचं ठिकाण नाही, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT