मुंबई

VIDEO : रोबोट 'गोलर' रुग्णांच्या सेवेत दाखल; कोरोना योद्धांची जोखीम कमी होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील वरळीच्या पोदार रुग्णालयात रोबोट ‘गोलर’ ऑन ड्युटी वर दाखल झाला आहे. अन्न,पाणी आणि औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम 'गोलर' करत आहे. #WarAgainstVirus मधील हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे.

मुंबई मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' सुरू आहे. दरम्यान, आता मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश मिळताना दिसत आहे. पण आता लढाईमधील कोविड योद्धे सुरक्षित ठेवण्यासाठी गोलर (Gollar) हा रोबोट दाखल झाला आहे. नुकतीच त्याची सेवा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंगळवारी रोबोट गोलर मच्या सेवेचा पहिला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यामध्ये 'आपला रोबोट ‘गोलर’ मुंबईच्या पोद्दार रुग्णालयात ड्युटीवर दाखल झाला आहे. अन्न,पाणी व औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम 'गोलर' करत आहे. WarAgainstVirus मधील हे महत्त्वाचे पाऊल आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे.' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान, या रोबोटमुळे कर्मचार्‍यांना पीपीई कीट घालून करावी लागणारी रूग्णसेवा, त्यावरचा ताण कमी होणार आहे. हा रोबोट गोलर स्थानिक कोविड फ्रंटलाईन वर्कर्सनी बनवला असल्याची माहिती वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिली आहे. वरळी हा एकेकाळी मुंबई शहरामधील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा वॉर्ड होता. मात्र, आता त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 

या रोबोटचा फायदा नक्कीच होतो आहे. कारण, रुग्णांना ज्या गोष्टी द्याव्या लागतात जसे की डिसपेंसरीसाठी खूप मोठी मदत होत आहे. यातून डाॅक्टरांचा होणारा जो धोका आहे तो कमी होणार आहे. औषधं, नाश्ता, जेवण, पाणी हे सर्व देण्यासाठी या रोबोटचा फायदा नक्कीच होतो आहे. डाॅक्टरांचा जो रुग्णांशी होणारा संपर्क आहे तो कमी होणार आहे. 

डाॅ. प्रद्या कापसे, सहाय्यक प्राध्यापक, सर्जरी विभाग, पोदार रुग्णालय

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikki Bhati : CCTV फुटेज, रुग्णालयाच्या Memo ने उलघडले निक्कीच्या हत्येचे गूढ; हुंड्यासाठी होत होता छळ, पतीला होणार फाशी?

मालिकेत तर संस्कारी पण घरी सून म्हणून कशी वागते मृणाल दुसानिस? खऱ्या आयुष्यातील सासूबाई म्हणाल्या- ती स्क्रीनवर जशी दिसते...

Pune Ganesh Festival: माधुरीचं काय चुकलं? पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायची सुमित्रा हत्तीण, काय आहे इतिहास?

शाहरुख-दीपिका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल! कोर्टाच्या आदेशानंतर दाखल झाली एफआयआर, नक्की काय आहे प्रकरण?

Ganesh Chaturthi 2025: एकदंतासमोर राशींनुसार करा 'या' मंत्रांचा जप, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका

SCROLL FOR NEXT