मुंबई

MNS Candidate: मनसेचा विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर; 'या' नावावर अखेर शिक्कामोर्तब

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाजी मारली असून सर्वात आधी आपला विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. हे जाहीर करताना मनसे महायुतीतून बाहेर पडल्याचं चित्र दिसत आहे. (Vidhan Sabha Election 2024 MNS first candidate annnounded Sandip Rane Mira Bhayander Constituency by Avinash Jadhav)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मीरारोड भागात स्थानिक मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून साजरा करण्यात आला. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी थेट घोषणाच केली. महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेने थेट उमेदवारच जाहीर केल्यानं खळबळ उडाली आहे. जाधव यांनी केलेल्या या घोषणेमुळं मनसेचा एकेला चलोचा नारा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या कार्यक्रमात बोलताना अविनाश जाधव म्हणाले, "संदीप राणे यांच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आपल्या सर्वांना पहायला मिळाली आहे. त्यामुळं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की संदीप ज्या पद्धतीनं काम करतोय त्यामुळं १४५ मीरा-भाईंदर या विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तो उमेदवार असेल. अभिजीत पानसे, राजू पाटील आणि मी आम्ही संदीप राणेंसाठी ही जागा नक्कीच घेऊन येऊ. संदीप आमदार झाले पाहिजेत ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे," असं आवाहनही यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते उर्वरित जागांसाठी सक्षम उमेदवारांची चाचपणी करणार आहेत. त्यानंतर उमेदवारांची नावं जाहीर होण्याची प्रक्रिया सुरु होईल. पण राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच अविनाश जाधवांनी अभिजीत पानसे यांच्या साक्षीनं पहिला उमेदवार जाहीर केल्यानं आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT