dombivali 
मुंबई

दयात्रेस निघालेल्या विद्याधर भुस्कुटे यांची गिनिज बुकात नोंद झाली पाहिजे

संजीत वायंगणकर

डोंबिवली - साबरमती ते शांतीनिकेतन पदयात्रेला निघालेले डोंबिवलीकर विद्याधर भुस्कुटे यांच्या नावाची गिनिज बुकात नोंद झाली पाहिजे. तसेच देऊन भुस्कुटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी मागणी शिवसेना करणार असल्याचे यावेळी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले. 

साबरमती ते शांतीनिकेतन या 75 हजार कि.मी. पदभ्रमणयात्रेस शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना शहर शाखा डोंबिवली शहर व ग्रामीण वतीने सोमवारी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काश्मीर ते कन्याकुमारी व किथीबू ते पोरबंदर अशा भारतदेशाच्या उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम असे दोन पदभ्रमण उपक्रम यशस्वी पूर्ण करणा-या डोंबीवलीकर विद्याधर विठ्ठल भुस्कुटे यांचे नाव लिम्का बुकात नोंद आहे. आता वयाच्या 67 व्या वर्षी भारताच्या पश्चिम ते पूर्व अशा या मोहिमेची नोंद गिनिज बुकात झाली पाहिजे यासाठी तमाम डोंबिवलीकरांतर्फे शुभेच्छा देऊन, भगवा झेंडा दाखवून पदभ्रमण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी महापौर विनिता राणे, जिल्हाप्रमुख  गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे, महिला संघटक कविता गावंड, विंदा भुस्कुटे, सहाय्यक पोलिस उपायुक्त रविंद्र वाडेकर, वपोनी विजयसिंह पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्याधर विठ्ठल भुस्कुटे वयाच्या 67व्या वर्षी या प्रवासाला सुरुवात करीत आहेत. ही तिसरी पदभ्रमणयात्रा आहे. नागरिकरांकडून शुभेच्छा देत आहे असे महापौर विनिता राणे म्हणाल्या. डोंबिवलीच्या शिरपेचात तुरा खोवण्याचे कार्य करित आहे..लोकच यांच्याबद्दल पुस्तके लिहितील. शिवसेनेच्या महिलांच्या वतीने भुस्कुटे यांचे औक्षण करून शाल व श्रीफळ देउन भुस्कुटे यांचा सत्कार करण्यात आला. `जय हिंद`, `भारत माता की जय` अश्या घोषणां देत ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पदभ्रमणयात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परिवहन सदस्य संतोष चव्हाण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT