मुंबई

एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही महिला सुखरुप, पोलिसांच्या सतर्कतेने आत्महत्येचा प्रयत्न फसला

रवींद्र खरात

कल्याण : आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेच्या अंगावरून एक्‍स्प्रेस जाऊनही रेल्वे पोलिस आणि लोकोपायलटने सतर्कता दाखवून तिला बचावल्याची घटना रविवारी, 30 ऑगस्टला कल्याण रेल्वेस्थानक परिसरात घडली. सुमंगला वाघ (54, रा. खडकपाडा-कल्याण) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सुमंगला वाघ ही महिला कल्याण रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील रेल्वे वसाहत परिसरातून रेल्वेच्या आवारात शिरली. त्याचवेळी समोरून एक्स्प्रेस येताना पाहून ती रुळावर आडवी पडली. आरपीएफ जवान जितेंद्र यादव आवारातून रेल्वे स्थानकाकडे जात असताना या महिलेला ट्रॅकवर पडलेले पाहून त्यांनी मोठ्याने आवाज दिला.

या महिलेने त्यांना पाहून मोठ्याने ओरडून डोके रुळावर ठेवल्याने जितेंद्र यांनी लोकोपायलटला आवाज देऊन सतर्क केले. लोकोपायलटनेही तात्काळ ब्रेक लावला तरी इंजिन लगेचच न थांबल्याने तिच्या आंगावरून गेले. याचवेळी यादव यांनी सतर्कता दाखवत महिलेला रुळावरून खेचून सुखरूपरित्या बचावल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

महिलेची सुटका केल्यानंतर तिला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. रेल्वे सुरक्षा बल पोलिस आणि लोकोपायलटच्या समयसूचकतेचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे. आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त के. के. अशरफ यांनीही, कोरोना महामारीच्या काळात रेल्वे कर्मचारी सतर्क राहून काम करीत असल्याचे सांगून या दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कौटुंबीक  कलहातून आत्महत्येचे पाऊल 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरातच राहते. कौटुंबीक भांडणांतून तीने हे पाऊल उचलले. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांना घडल्या प्रकाराबाबत माहिती दिल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
--------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT