Jayant Patil  Sakal
मुंबई

Jayant Patil : मतमोजणी प्रक्रियेत सावध राहा; जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना पत्र; फेरफार होण्याची भीती

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता आपण सगळ्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता.४) होत आहे. या प्रक्रियेदरम्यान सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता आपण सगळ्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. सर्वांनी जो संयम आणि दक्षता विविध टप्प्यावर बाळगली, तोच संयम आणि तीच सतर्कता मतमोजणी संपेपर्यंत आणि विजयाचे प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंत आपल्याला बाळगायची आहे.

या कालावधीत सत्ताधारी पक्षाकडून दिशाभूल करून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होईल, परंतु आपण पूर्णपणे दक्ष राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. पाटील पुढे म्हणाले, ‘‘देशात इंडिया आघाडीलाच बहुमत मिळणार असल्याचे अनेकांच्या लक्षात आले असतानाही सत्ताधारी दिशाभूल करत आहेत. कारण, तुम्हाला संभ्रमात टाकून मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो’’, असेही त्यांनी म्हटले आहे.

आमच्यातील कोणीही भाजपत जाणार नाही

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीने लोकसभा निवडणुकीत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीलाही आम्ही एकत्रित सामोरे जाणार आहोत.

आमच्यातील कोणीही भाजपच्या संपर्कात नाही. कोण कोठे थांबणार आणि कोठे जाणार हे जनतेला माहिती आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. मंत्री अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपत जाणार असल्याचा दावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pancard Update : एक चूक अन् 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड होईल बंद..आत्ताच करून घ्या 'हे' एक काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

Ranji Trophy 2025 : यशस्वी जैस्वालने झळकावले शतक; मुंबईचा पराभव टाळण्यासाठी ठोकला शड्डू, मुशीरची फिफ्टी, अजिंक्य अपयशी

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

मलायकाचा बॉयफ्रेंड? फिटनेस क्वीनसोबत दिसणारा तो मिस्ट्री मॅन कोण? अभिनेत्रीपेक्षा 17 वर्षांनी आहे लहान

Pune News: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’, भरधाव वेगामुळे अपघात; बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळील घटनेबाबत पोलिसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT