मुंबई

OBC आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत, राज्यपालांच्या भेटीनंतर स्पष्ट

ओमकार वाबळे

ओबीसी समाजाच्या राजकीयच आरक्षणासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनिश्चितता समोर आली. सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा मागासवर्गीय आयोगाकडे सोपवला. दरम्यान, महाविकास आघाडीने यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मंत्र्यांनी राज्यालांची भेट घेतली. (Vijay wadettiwar meets governor koshyari)

महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय ( OBC Reservation ) न घेण्याच्या विधेयकाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. ओबीसी समाजाला हा निर्णय हा न्याय देण्याच्या प्रक्रियेत योगदान देणारा असल्याने या विषयावर मंत्री विजय वडेट्टीवारांनी राज्यपालांची भेट घेतली.

वडेट्टीवार काय म्हणाले ?

  • काल obc 50% बिलावर सही केली, अरक्षणाचा मार्ग मोकळा झाला म्हणून आभार मानायला आलो होतो

  • obc शी निगडित इतरही काही बिलांवर शी करावी ही विनंती केली, न्याय मिळेल ही अपेक्षा

  • सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे किमान अंतरिम अहवाल पाठवावा, आयोग सकारात्मक वाटतं आहे, अहवाल आला तर निवडणूक आयोगाकडे पाठवू

  • - 8 तारखेच्या निर्णयावर अधिक गोष्टी अवलंबून आहेत, कायद्याच्या चौकटीत कसे बसेल हे बघावे लागेल

  • - उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक होती, त्यांना वाटलं म्हणून ते गेले, आम्ही संघटक म्हणून गेलो

  • obc हिताचा निर्णय जो कोणी घेईल उद्या फडणवीस यांनी निर्णय घेतला तर त्यांचंही अभिनंदन करू

  • 27% आरक्षण हा आमचा अधिकार आहे आणि तो मिळावा

  • मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय आरक्षण वगळून आरक्षण मिळेल यामुळे काही जिल्हात कमी जास्त आरक्षण मिळेल

  • 243 बी आणि डी यामध्ये केंद्र सरकार सुधारणा केली तर प्रत्येक राज्यात obc ना आरक्षण मिळेल

  • 27% आरक्षण आता bjp ने लागू करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

NH 465 Expansion: अक्कलकोटला नवा विकासमार्ग: राष्ट्रीय महामार्ग 465 रुंदीकरणासाठी 740 कोटी

SCROLL FOR NEXT