Vikas Mhatre and minister ravindra chavan sakal
मुंबई

Vikas Mhatre : मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर विकास म्हात्रे यांनी राजीनामा मागे घेतला

डोंबिवली पश्चिमेतील भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे तसेच कार्यकर्त्यांसह भाजप सदस्यत्वाचा राजीनामा गेल्या आठवड्यात दिला होता.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे तसेच कार्यकर्त्यांसह भाजप सदस्यत्वाचा राजीनामा गेल्या आठवड्यात दिला होता. यानंतर नाराज म्हात्रे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच सोमवारी संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे यांची भेट घेतली. या भेटीनंतर विकास म्हात्रे राजीनामा मागे घेत भाजपसाठी जोमाने काम करण्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांना दिले.

भाजपचे माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांसह माजी नगरसेविका कविता म्हात्रे व काही कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात मंगळवारी 16 जानेवारीला भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. विकास कामासाठी निधी मिळत नसल्याची बाब म्हात्रे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले होते. यामुळे भाजप गोटात एकच खळबळ उडाली होती. केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार असताना आपल्या राजूनगर, गरीबाचापाडा प्रभागात रस्ते, गटार इतर विकास कामे होत नसल्याने नागरिक नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मंडल अध्यक्ष समीर चिटणीस यांनी मध्यस्थी करून सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विकास म्हात्रे यांची भेट घडवून आणली. या भेटीत म्हात्रे यांचे सर्व गैरसमज दूर करण्यात आले. चव्हाण यांच्या भेटीनंतर म्हात्रे यांनी राजीनामा मागे घेत भाजपसाठी पुन्हा जोमाने काम करण्याची तयारी दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT