Vikhroli Railway Station sakal
मुंबई

Railway Station : विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार रेल्वे या रेल्वे स्थानकांचा होणार विकास

वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक येथील पुलांच्या गर्डरची कामे मार्गी लावली जात आहेत. विकास कामे झपाट्याने कामे सुरू आहेत अशी माहिती ईशान्य मुंबईची खासदार मनोज कोटक यांनी दिली.

मुंबईत आणि विशेषतः ईशान्य मुंबईत अनेक विकास कामे मार्गी लावली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही कामे अंतिम टप्पात सुरू आहेत. ईशान्य मुंबईचा संपूर्ण कायापालट करून नागरिकांना आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती खासदार कोटक यांनी दिली आहे. खासदार कोटक यांनी ईशान्य मुंबईतील नागरी सुविधांची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

एलबीएस रोड, गोळीबार रोड, अंधेरी, घाटकोपर लिंक रोड आदी कामे मार्गी लावण्यात येत आहेत. तसेच, विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार रेल्वे स्थानक येथील पुलांच्या गर्डरची कामे मार्गी लावली जात आहेत. विद्याविहार रेल्वे स्थानक येथे १०० मिटर लांब व एक हजार मेट्रिक टन वजन गर्डरचे काम यशस्वीपणे पार पडले, अशी माहिती खासदार कोटक यांनी यावेळी दिली.

उपनगरीय रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी एस्केलेटर सुविधा आणि अन्य सेवासुविधा उपलब्ध करून रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या केंद्र, राज्य सरकार व मुंबई महापालिका यांच्या माध्यातून सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून रस्ते, पूल, कचरा विल्हेवाट, शौचालये आदी विकासकामे करीत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन व गरीबांचे सरकार म्हणून महिला, बेरोजगार, शेतकरी, विद्यार्थी आदिसाठी राबविलेल्या विविध योजना, रस्ते, पूल आदींची उभारणी, महिलांसाठी रोजगार, उज्वला गॅस योजना, मोफत अन्न धान्य आदींबाबतची माहिती खासदार कोटक यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT