Sharad Pawar Vinayak Mete Sakal
मुंबई

मेटेंची उद्दिष्टं सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण करणं हीच खरी श्रद्धांजली - शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

आमदार विनायक मेटेंचा आज सकाळी अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. शरद पवार हेही त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यांनी यावेळी मेटेंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आजच्या दिवसाची सुरुवातच धक्कादायक होती. सामान्य कुटुंबात जन्मलेली एखादी व्यक्ती राज्यपातळीवर कसा प्रभाव पाडते याचं मेटे उत्तम उदाहरण होते. मराठा आरक्षण प्रश्नाबद्दल जनमत तयार करण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. आर आर पाटलांच्या सोबत त्यांच्या कामाची सुरुवात झाली. पहिल्यांदा ते राष्ट्रवादीचे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी भूमिका घेतली. आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांनी शिवसंग्राम पक्ष, तसंच शिवरायांच्या स्मारकासाठी त्यांनी एक व्रत घेतलं. राजकीय पेक्षा सामाजिक दृष्ट्या ते अधिक कार्यरत होते. त्यांच्या उद्दिष्टासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

विनायक मेटे यांचा पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ अपघात झाला. या अपघातात त्यांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Restriction: मोदी सरकारचा मोठा निर्णय! AI व्हिडीओ हटवले जाणार; अनेक विभागांना मिळणार कंटेंट काढण्याचे अधिकार

Education News : पालकांना मोठा दिलासा! आरटीई प्रवेशासाठी १ किमीची अट रद्द; आता ५ किमीपर्यंतच्या शाळा निवडता येणार

नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उडवून देण्याची धमकी; अज्ञात ई-मेलनंतर खळबळ, परिसरात हायअलर्ट

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Chain Snatching : नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस! २४ तासांत पाच महिलांना लुटले; ६ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT