Vinayak Raut 
मुंबई

Vinayak Raut : कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा खर्च केंद्राने उचलावा; ठाकरेंच्या खासदाराची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर एकच रेल्वे मार्गिका असल्याने रेल्वे वाहतुकीवर मर्यादा येत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे काळाची गरज असून त्यासाठी तब्बल २९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा खर्च कोकण रेल्वेच्या अवाक्याबाहेर आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा आर्थिक भार उचलावा किंवा कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोकणातील खासदार विनायक राऊत स्वता यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत हा मुद्दा मांडणार असल्याची माहिती दिली आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर दररोज वीस ते पंचवीस पेक्षा जास्त गाड्या धावत आहे. गणेश उत्सव, होळी सारख्या सणात मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात जातात. कोकणता जाण्यासाठी रस्तेमार्गापेक्षा रेल्वे मार्गाने जाण्यास प्रवासी प्राधान्य देतात. परंतु कोकण रेल्वे मार्गावर एकच मार्गिका असल्याने आणि कोकणात अनेक गाड्याना थांबे दिले जात नसल्याने कोकणातील रेल्वे प्रवाशांना फायदा होत नाही.

आता वंदे भारत ट्रेनही धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र दिवसोंदिवस गाड्यांची संख्या वाढत असल्याने त्यांचा वेग मंदावत आहे. समोरून येणारी गाडी जाईपर्यंत दुसरी गाडी स्थानकात दहा-पंधरा मिनिटे थांबवावी लागत आहे.

त्यामुळे कोकण रेल्वेने दुपदरीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार तब्बल २९ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र कोकण रेल्वेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता सदरचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात पुढील तीन वर्षे दहा-दहा हजार कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करावी किंवा केंद्रीय रेल्वेत विलिनीकरण करावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT