मुंबई

मुंबईतील रुग्णालयांतील फायर ऑडिट नियमांचे उल्लंघन; माहिती अधिकारातून उघड

मिलिंद तांबे

मुंबई   : मुंबईत केवळ 1390 रुग्णालये तसेच नसिंग होम चे रजिस्ट्रेशन झाले आहे. त्यातील अनेक रुग्णालयांत 'फायर एनओसी' नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एम पूर्व विभागात यातील अधिकतर रुग्णालये असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. पालिकेच्या एम पूर्व विभागात 49 रुग्णालये तसेच नर्सिंग होम अवैध असल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते शकेल अहमद यांना माहितीच्या अधिकाराखाली एम पूर्व विभागाने ही माहिती दिली आहे. त्यातील अधिक ता नर्सिंग होम हे झोपडपट्टी परिसरातील अवैध इमारतींमध्ये सुरू आहेत. अशा नर्सिंग होम ची कायदेशीर नोंदणी देखील करण्यात आली नसल्याचे शकेल अहमद यांनी सांगितले. 

या रुग्णालयांत कोणत्याही प्रकारचे 'लाईफ सेविंग बॅकअप' देखील नाही. अगदी अडचणी च्या जागी यातील अनेक नर्सिंग होम थाटण्यात आले आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास रुग्ण किंवा नातेवाईकांना बाहेर काढण्यास किंवा पळून जाण्यास देखील सुरक्षित मार्ग नसल्याचे शकिल यांनी सांगितले. मात्र अशा रुग्णालयांत तसेच नर्सिंग होम मध्ये शल्य चिकित्सा व महिलांच्या प्रसुती सुरू असल्याचे ही शकिल अहमद यांनी निदर्शनास आणले आहे.  मुंबईत केवळ 1319 नोंदणीकृत रुग्णालये तसेच नर्सिंग होम आहेत. त्यातील काही खासगी मोठी रुग्णालये सोडली तर अनेक सरकारी मोठ्या रुग्णालयांसह नर्सिंग होम मध्ये फायर एनओसी चे उल्लंघन होत आहे. इतकेच नाही तर एम पूर्व विभागातील 39 नर्सिंग होम ला अग्निशमन दल किंवा इमारत बांधकाम विभागाकडून एनओसी मिळालेली नाही तर 49 नर्सिंग होम अवैधपणे सुरू असल्याचा दावा ही शकिल महमद यांनी केला आहे. 

याप्रकरणी शकिल अहमद यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पत्र लिहून अशा रुग्णालयावर एफआयआर करण्याची मागणी देखील केली. पोलिसांनी एम पूर्व येथील वैद्यकीय अधिकारी डॉ हरीश नौनी यांना पत्र लिहून तक्रार नोंदवण्यास सांगितले. मात्र त्यांनी अद्याप या प्रकरणी तक्रार नोंदवली नसल्याची माहिती ही शकील अहमद यांनी दिली.

कोलकाता रुग्णालय दुर्घटनेनंतर अग्नी सुरक्षेबाबत नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय झाला. बरीच रुग्णालये त्या नियमांची अंमलबजावणी करत नाहीत. सरकारी रुग्णालये ही याबाबत उदासीन आहेत. यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.


-एम व्ही देशमुख ,
माजी संचालक , अग्नी सुरक्षा , महाराष्ट्र राज्य

Violation of fire audit rules in Mumbai hospitals Disclosed by RTI

--------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT