Uddhav Thackeray, Rashmi Thackeray, Aditya Thackeray 
मुंबई

ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून अचारसंहितेचा भंग? तक्रार दाखल

सर्वोच्च न्यायालयातील महिला वकिलानं याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या या कृतीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल झाली आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी ही तक्रार दाखल केली. (Violation of code of conduct by Rashmi Thackeray Aditya Thackeray during flag hoisting Complaint filed)

भारताच्या 73 व्या प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व मुलगा आदित्य ठाकरे यांच्या कडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत अॅड. जयश्री पाटील यांनी लोकयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाला सॅल्यूट करण्यात आला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

तक्रारदारानं तक्रारीत काय म्हटलंय?

तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. पण याबद्दल माझा काही आक्षेप नाही, कोणी एम. के. गांधी यांच्या विचारांचे तर कोणी श्रीमान नथुराम गोडसे यांच्या विचाराला मान्यता देऊ शकतात. तो त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजवंदन करणारे उपस्थित असतात, यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या रेड कार्पेटवर ध्वजारोहणानंतर सलामी देत नाहीत, हे कोणतं शहाणपण? त्यांना ध्वज संहिता आणि प्रजासत्ताक मान्य नाही का? सार्वजनिक जीवनात ध्वजसंहितेचा अपमान करणे हे हिंदुस्थानी भारतीय नागरिकांचा सार्वजनिकरित्या भावनांचा अपमान केल्यासारखं आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रगीताचा अपमान या संबंधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून अक्षम्य अपराध झाला आहे. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT