मुंबई

डेटॉलने धुवा हातपाय आणि #Coronavirus ला करा बाय बाय ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात सध्या कोरोना व्हायरसने लोक भयभीत आहेत. चीनमध्ये दिवसागणिक अनेक लोकं कोरोना व्हायरसमुळे आपला प्राण गमावतायत. आतापर्यंत तीनशेहून अधिक नागरिकांना कोरोनामुळे आपल्या प्राणांना गमवावं लागलंय. अशात धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा देखील पसरवल्या जातायत. यातील सर्वात भीषण अफवा म्हणजे डेटॉलचे लिक्विड जखमांवर लावल्यास किंवा या लिक्विडने हात साफ केल्यास कोरोनापासून सुटका होऊ शकते हा संदेश. होय सध्या सोशल मीडियावर हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय.

या मेसेजसोबत काही फोटो देखील सध्या ट्विटर फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल होतायत. या फोटोमध्ये डेटॉलची एक बाटली दिसतेय. डेटॉलच्या बाटलीच्या मागे त्याबद्दलची थोडक्यात माहिती लिहिलेली असते. अशात व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये डेटॉल लिक्विड आणि 'डेटॉल स्प्रे'च्या बाटलीमागे H1N1 त्याचसोबत कोरोना आणि RSV हे विषाणू देखील डेटॉलमुळे मारता येतात असं लिहिल्याचं दिसतंय. डेटॉलमुळे सर्दी खोकल्याच्या विषाणूंपासून आणि इतर आजार पसरवणाऱ्या आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. त्यामुळे जर डेटॉलमुळे कोरोना सारख्या विषाणूचा खातमा होऊ शकता असेल, तर ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. 

डेटॉलचं स्पष्टीकरण : 

मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या फोटोंमुळे डेटॉल कंपनीने पुढे येत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. डेटॉलमुळे कोरोना व्हायरसच्या विषाणूंचा खातमा होऊ शकतो, असं आपण म्हणू शकत नाही असं डेटॉल कंपनीने स्पष्ट केलंय. 

कोरोना लक्षणे :  

भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात तब्बल २००० नागरिकांना सध्या कोरोनाच्या भीतीमुळे देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना सुरवातीला ताप, कफ, श्वासाचा त्रास होतो. नंतर हे आजार तीव्र स्वरूप धारण करतात.     

viral images of dettol says dettol handwash kills coronavirus bacteria

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT