Thief steal money from ATM  sakal medi
मुंबई

विरार : ATM मधून पैसे काढून देतो असा करायचा बहाणा अन् मग...

विक्रम गायकवाड

नालासोपारा : एटीएम (ATM) सेंटर मधून पैसे काढून देण्याचा बहाणा करून, एटीएम कार्डाची (ATM card) हातचलाखी करून, नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील 2 जणांच्या (culprit arrested) मुसक्या आवळण्यात विरार गुन्हे शाखा (virar crime branch) कक्ष 03 पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपी कडून 5 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असवून, या आरोपींना वालीव मधील 2, आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात 1 अशा तीन गुन्ह्याची कबुली दिली आहे.

परवेझ अकबरअली शेख (वय 31), शंकर रंगनाथ सुरडकर (वय 37) असे अटक आरोपीचे नाव असून, यातील परवेझ हा कल्याण च्या महारळगाव चा तर शंकर हा उल्हासनगरच्या ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी मधील रहिवाशी आहे. मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत सक्रिय झाली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीला पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. विरार गुन्हे कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने तांत्रिक बाबी आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून 2 सराईत गुन्हेगारांना अटक केले आहे. आणखी यांनी कुठेकुठे गुन्हे केले आहेत, गुन्ह्यांचे स्वरूप काय आहे याचा तपास आता पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT