selfie death sakal media
मुंबई

सेल्फी काढणं जीवावर बेतलं ; बोट उलटून एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

विजय गायकवाड

नालासोपारा : विरार पूर्व (virar) नारंगी खाडी येथे बोटीवर वाढदिसाची पार्टी (birthday party) साजरी करताना, सेल्फी काढण्याच्या (selfie) नादात, बोट उलटून (boat collapse) एकाचा पाण्यात बुडून मृत्यू (death) तर इतर सर्वजण सुखरूप असल्याची घटना रविवार ता 08 रोजी घडली आहे. याबाबत अर्नाळा (arnala police station) सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शशिकांत गोविंद गुरव (वय 54) असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 10 ते 12 मित्रांसह विरार पूर्व नारंगी खाडीत बोटीवर रविवारी वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेले होते. रेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या नांगरलेल्या बोटीवर त्यांनी ही पार्टी बोटीत ठेवली होती. पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यासाठी गुरव आणि त्यांचे मित्र बोटीच्या एका दिशेला गेले असता बोट अचानक पलटी झाली. आणि बोटीतील सर्वजण खाडीच्या पाण्यात पडले होते.

पण गुरव यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडओरड केली तेव्हा सोबतच्या सहकार्या सह अन्य गावकरी यांनी तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काडून, दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. नारंगी खाडीत नांगरलेल्या बोटीत वाढदिवसाची पार्टी करताना बोट उलटून एकाचा मृत्यू झाला आहे. या पार्टीची त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या संदर्भात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून आम्ही तपास करीत आहोत असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

एका क्षणात सगळं बदललं ! मधू कांबीकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, स्टेजवर नाचल्या, अन्...!

सारा तेंडुलकरच्या बर्थडे पार्टीत तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण कोण? वहिनी सानिका पाहतच राहिली; Video Viral

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवात नाही, तर कधी वाजणार? अंबाबाई मंदिर परिसरातील ‘म्युझिकल खांब’ बंदच; लाखो रुपये खर्च

SCROLL FOR NEXT