virar crime sakal media
मुंबई

आईच्या मारहाणीत २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, हत्येचा गुन्हा दाखल

विजय गायकवाड

नालासोपारा : रागाच्या भरात आईने (mother) मुलीला मारहाण केल्याच्या घटनेत  2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. याबाबत प्रथम अकस्मात मृत्यूची ( daughter death) नोंद करून, शवविच्छेदन अहवाल (postmortem report) नंतर आज सोमवार ता 09 रोजी विरार पोलीस ठाण्यात (virar police station) आई च्या विरोधात हत्येचा गुन्हा (murder case) दाखल करून , आईला अटक(arrest) करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

नानसी सोनुकुमार सोनी (वय 02) असे आईच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या चिमुकलीचे  नाव आहे.  नेहा सोनुकुमार सोनी (वय 22) असे हत्या केलेल्या  आईचे नाव आहे.  हे दाम्पत्य विरार पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात आपर्टमेंट मध्ये राहतात. राहत्या घरातच ही घटना घडली आहे. सोनी यांचा पती रिक्षाचालक असून, पत्नी गृहिणी आहे. या दाम्पत्याना 2 मुलीच आहेत. नानाशी ही मोठी मुलगी असून, अशा ही 1 वर्षांची लहान दुसरी मुलगी आहे. तर तिसऱ्या दा पुन्हा आरोपी पत्नी नेहा ही गरोदर आहे. शनिवारी दुपारी अडीच च्या सुमारास आईने रागाच्या भरात आपल्या 2 वर्षाच्या नानशी या मुलीला बेदम मारहाण केली.

त्यात ती बेशुद्ध झाली होती. पत्नीने याची माहिती पतीला दिल्या नंतर मुलीला तात्काळ उचलून विरार पश्चिम ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर ने तिला मृत घोषित केले होते. यावरून वडिलांच्या तक्रारीवरून प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आज सोमवार मुलीच्या शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर तिच्या डोक्यावर, अंगावर अंतर्गत जखमा आढळून आल्याने तिला मारहाण झाले असल्याचे उघड झाले आहे. आज सोमवार ता 09 रोजी विरार पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरून तपास करून आई विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केले असल्याची माहिती विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे. 

आरोपी आई ही नेहमी घरात भांडण करत होती. आपल्या मुलांना ही वारंवार बेदम मारहाण करीत होती. मुलांच्या ओरडण्याने जर कोणी घरात शेजारी सोडवायला किंवा समाजावयाला गेले तर त्यांनाही उलटसुलट बोलून हाकलून देत असत. तिच्या ह्या विकृत रागातूनच 2 वर्षाच्या चिमुकलिची हत्या झाली आहे. तिला कडक शासन झाले पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया शेजारच्या महिलांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT