virar police raid sakal media
मुंबई

विरार: रिसॉर्ट मधील डान्सबारवर पोलिसांचा छापा, १६ मुली अटकेत

छाप्यात 5 लाख 27 हजार 343 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

विजय गायकवाड

नालासोपारा : विरार पूर्व चांदीप परिसरातील मॉस रिसॉर्ट (virar moss resort) मधील डान्सबार वर विरार पोलिसांनी (police raid) आज शुक्रवार ता 06 रोजी छापा टाकून 16 मुली आणि 15 पुरुषांना अटक (arrest) केले आहे. या छाप्यात दारूच्या बाटल्या, 2 नोटा मोजण्याच्या मशीन, डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्ड स्वॅप करण्याच्या 3 मशीन, मोबाईल फोन व इतर साहित्य असा 5 लाख 27 हजार 343 रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. याबाबत भारतीय दंड संहिता कलम 294, 188, 269, 109, 114, 34 सह महाराष्ट्र पोलीस (maharashtra police) कायदा कलम 33 (डब्ल्यू) सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 68 प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात (virar police station) गुन्हा दाखल करण्यात (fir) आला आहे. (virar moss resort-police raid-arrest-virar police station-fir-nss91)

विरार पूर्व शिरसाड ते वज्रेश्वरी रोडवर मॉस रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये अंधेरी, मिरारोड परिसरातून मुली आणून बेकायदेशीर डान्सबार सुरू करण्यात आला होता. विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना आपल्या गुप्त बातमीदारा कडून या डान्सबार ची माहिती मिळाली होती. त्यांनी आपल्या वरीष्ठ च्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करून, रात्री 12 च्या सुमारास रिसॉर्ट मधील डान्स बार वर छापा टाकला असता रिसॉर्ट चे मालक व चालक यांनी संगनमताने, कोरोनाचे नियम पायदळी तुडवून, ऑर्केस्ट्रा बार बनविलेल्या हॉल मध्ये महिलांचे अश्लील वर्तन आणि पुरुषाशी lagat करत असल्याचे दिसून आले आहे. ज्या मुली आणण्यात आल्या होत्या त्या अंधेरी, मिरारोड मधील हायप्रोफाईल घरातील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी या छाप्यात रोख रक्कम 2 लाख 30 हजार, दारूच्या बाटल्या, 2 नोटा मोजण्याच्या मशीन, डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्ड स्वॅप करण्याच्या 3 मशीन, मोबाईल फोन व इतर साहित्य असा 5 लाख 27 हजार 343 रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. अटक सर्व आरोपीना आज वसई न्यायालयात हजर केले आहे. याबाबत न्यायालयाने मॅजेस्टिक कोठडी सुनावली असून, त्यांच्या जामीन बाबत कोर्ट निर्णय घेणार असे विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : कर्नाटक काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटक भवन सोडले

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT