Boling Encroachment Update eSakal
मुंबई

Virar Encroachment: विरारमध्ये नाल्यावर अतिक्रमण, पावसाळयात मोठा धोका

Boling Encroachment Update: पलिके कडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही

सकाळ वृ्त्तसेवा

विरार पश्चिमेला नाल्यावर झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून याठिकाणी लहान मुलांसह नागरिक राहत आहेत. तर ह्या झोपड्या नाल्या लागत असल्याने पावसाळ्यात नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तर यावर कोणत्याही प्रकारची कारवाई पलिके कडून केली जात नाही आहे.

विरार पश्चिमेला बोळींज आगाशी रस्त्यालगत असलेल्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या लागत झोपड्या बांधण्यात आल्या असून नागरिक परिवार सह राहत आहेत. याठिकाणी नाल्या लागत जवळपास ५ ते ६ झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. तर यावर पालिका कोणतीही कारवाई करत नाही आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून हे अतिक्रमण असून पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्याठिकाणी या झोपड्या आहेत तिथे कोणतीही संरक्षक भिंत नाही. तर लहान मुले इथे बिन्धास्त फिरत आहेत. तसेच याठिकाणी झोपाळा देखील बांधण्यात आला आहे.

पावसाळा सुरू झाला असून पहिल्याच पावसात विरार मध्ये पाणी टुंबण्याच्या समस्यांमध्ये वाढ पाहायला मिळाली होती. तर येणाऱ्या महिन्यांमध्ये या नाल्याचे पाणी वाढले तर मोठी दुर्घटना होऊ शकते.

नाल्याच्या प्रवाहात लहान मुलांचा व इथे राहत असलेल्या नागरिकांचा जीव जाऊ शकतो. तर हे अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या अतिक्रमण कडे प्रशासनाचा लक्ष जात नसल्याने इथे झोपड्यांचे संख्या वाढत आहे. तर आता यावर कारवाई करत पालिकेने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT