मुंबादेव : अनंत चतुर्दशीला (anant chaturdashi) गणेश विसर्जनासाठी (Ganpati visarjan) कर्तव्यावर असलेले कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रकाश कदम (prakash kadam death) यांचे हृदय विकाराच्या (heart attack) तीव्र झटक्याने निधन झाले. शिपाई कदम हे मोबाईल एक वर कार्यरत होते. त्यांनी रात्री गणपती विसर्जन बंदोबस व्यवस्थितरित्या पार पाडला व सकाळी चार वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
कदम ताडदेव पोलीस वसाहत येथे राहतात. त्यांच्या पश्यात आई,पत्नी आणि मुले असा परिवार आहे. मुंबई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. कुलाबाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कुसुम वाघमारे मॅडम यांनी आणि सहकारी यांनी या दुःखद घटनेमुळे शोक व्यक्त केला. अत्यंत धाड़सी, मन मिळावू आणि कर्तव्यदक्ष पोलीस सहकारी आपल्याला सोडून गेल्याचे दुःख कुसुम वाघमारे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.