Swami Avimukteswaranand Shankaracharya 
मुंबई

Swami Avimukteswaranandan: "उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू नाहीत""; PM मोदींना आशीर्वाद देणारे शंकराचार्य मातोश्रीवर काय म्हणाले?

बद्रिनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री इथं भेट दिली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : बद्रिनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री इथं भेट दिली. यावेळी त्यांचं ठाकरे कुटुंबाकडून मोठ्या उत्साहत स्वागत करण्यात आलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शंकराचार्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं म्हटलं.

तसंच जे विश्वासघात कतात ते हिंदू नाहीत अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद दिले होते.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांच्या उपस्थित आज मातोश्रीवर पूजा पार पडली. या भेटीदरम्यान ठाकरे कुटुंबानं शंकराचार्यांचं पादुका पूजन केलं. पादुका पूजनावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते. अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेला स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी विरोध केला होता. पण त्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिलं होतं.

दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य म्हणाले, आम्ही सनातन धर्माचं पालन करणारे लोक आहोत. यामध्ये पाप-पुण्याची भावना सांगितली आहे. यामध्ये सर्वात मोठा घात हा गौघात सांगितला गेला आहे. पण त्याहूनही मोठा घात म्हणजे विश्वासघात होय. जो तुमच्या उद्धव ठाकरेंसोबत झाला आहे, याचा त्रास अनेकांना झाला आहे. जोपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर तुम्ही विराजमान होत नाही तोपर्यंत आम्हा लोकांच्या मनाची ही पीडा दूर होऊ शकत नाही.

कोणाचं हिंदुत्व असली आहे त्यासाठी हे जाणावं लागेल की जो विश्वास घात करेल तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करेल तो तर हिंदू असेलच कारण त्याच्यासोबत विश्वासघात झालेला आहे. त्यामुळं ज्यांनी विश्वासघात केला आहे ते हिंदू कसे असू शकतील. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आता हे सिद्धही झालं आहे की उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. हे ठीक नाही कारण हा जनतेचा देखील अनादर आहे. मध्येच सरकार तोडणं ही चांगली गोष्ट नाही. जे खरं आहे तेच शंकराचार्य सांगणार, आम्हाला राजकारणाशी घेणदेणं नाही. पाप आणि पुण्य ही तर धर्माची बाब आहे त्यावर कोण बोलणार? त्यावर धर्माचार्यच बोलणार ना?

दुसरं केदारनाथ होऊ शकत नाही

प्रतिकात्मक केदारनाथ मंदिर बनू शकत नाही. पुराणात सांगितला आहे बारा ज्योतिर्लिंग असतात. जिथे त्यांचं ठिकाण आहे तिथेच ही मंदिरं झालेली आहेत. केदारनाथ म्हणजे केदार हा हिमालयाच्या पृष्ठभागावर आहे. केदार जर हिमालयात आहे तर तुम्ही दिल्लीत का आणताय? त्याचा पत्ता आधीच सांगितलेला आहे. तुम्ही जनतेला भ्रमात आणू नका. केदारनाथ दिल्लीत बनवणं ही एक चेष्टा आहे. धर्मस्थानात राजकारणातले लोक प्रवेश करत आहेत. केदारनाथमध्ये 228 किलो सोन्याचा घोटाळा झाला हा प्रश्न तुम्ही का उपस्थित करत नाही? आता दिल्लीत केदारनाथ बनवणार म्हणजे तिथे सुद्धा घोटाळा करणार का?

मोदींचा दुश्मन नाही

अंबानींच्या लग्न सोहळ्यात मोदी माझ्यासमोर आले त्यांनी मला प्रणाम केला आणि आमचा नियम आहे जो कोणी प्रणाम करायला येतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो. नरेंद्र मोदी माझे दुश्मन थोडी आहेत त्यांच्या हिताबद्दलच मी बोलत असतो. त्यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो. चूक झाली तर आम्ही त्यांना थेट चूक झाली म्हणून सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs KKR Live: कोलकाताने अखेर विजय मिळवला; राजस्थानला Rinku Singh चा झेल सोडणे महागात पडले, मुंबई इंडियन्सला धक्का

तोरणागडावर थरारक प्रसंग! मुंबईचा पर्यटक २०० फूट खोल दरीत पडला, अंधारात दोरखंड टाकून पर्यटकाला वर काढले, स्थानिकांच्या तत्परतेने टळला अनर्थ..

Pune Crime : हुंडाबळीचा विळखा: वाघोली-आव्हाळवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून दोन विवाहितांचा गळफास घेऊन मृत्यू

OpenAI मध्ये सर्वोच्च पद, कोट्यवधी रुपयांचं पॅकेज...तरीही का सगळं सोडून भारतात परतत आहेत श्रीनिवास नारायणन?

Team India: सूर्यकुमार यादवचा गेम होणार अन् श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कॅप्टन होणार?

SCROLL FOR NEXT