मुंबई

Thane Crime News: पोलिस ठाण्यात येऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यावर ब्लेडने हल्ला; विठ्ठलवाडी ठाण्यात नेमकं काय घडलं?

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर: घरगुती वादाची तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या एका दारुड्याने चक्क विठ्ठलवाडी ठाण्यात महिला पोलिसावर ब्लेडहल्ला केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगरात घडली आहे.

सकाळच्या सुमारास नशेत असलेला बाबासाहेब सोनवणे हा घरगुती वादाची तक्रार देण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आला. तो धिंगाणा घालत होता. महिला पोलीस कर्मचारी शीतल भांबळे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच,अचानक सोनवणे याने खिशातून ब्लेड काढले आणि महिला पोलीस कर्मचारी शीतल भांबळे यांच्या दिशेने सपासप वार करायला सुरवात केली. या अनपेक्षित हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि गालावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

या घटनेनंतर तातडीने उपस्थित पोलिसांनी दारुड्या आरोपी बाबासाहेब सोनावणे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिला पोलिस शीतल भांबळे यांना तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेनंतर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT