file photo
file photo 
मुंबई

मतदानासाठी ब्राझीलमधून मुंबईत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मतदानासाठी एक अवलिया थेट ब्राझीलवरून मुंबईत आल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. धीरेन मोरे असे या व्यक्तीचे नाव असून जो खास मतदानासाठी मुंबईत दाखल झाला आहे.

धीरेन मोरे (वय ४९) हे मूळचे रायगडमधील महाड तालुक्‍यातील असून त्यांचे कुटुंबीय गेली दोन पिढ्या दादरमधील हिंदमाता परिसरात राहतात. ते वडाळा मतदारसंघात ते मतदान करतात.  धीरेन यांचा स्वतःचा व्यवसाय असून व्यवसायानिमित्त ते १९९८ सालापासून ब्राझील देशात राहतात. आपल्या कामानिमित्त ते जगभर फिरत असतात. असे असले तरी निवडणुका असतात तेव्हा ते काहीही करून मुंबईत येतात आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावतात.

धीरेन मोरे २००० सालापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीतील मतदानासाठी हजर असतात. ते कामानिमित्त जरी जगभर फिरत असले तरी निवडणुकीच्या वेळी मुंबईत येण्याची योजना ते आखतात. मुंबईत महानगरपालिका, लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक असो; ते मतदानासाठी आवर्जून उपस्थित असतात. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते ब्राझील ते मुंबई प्रवासासाठी लाखो रुपये खर्च करण्याचीही त्यांची तयारी असते. मतदानासाठी आतापर्यंत ते १२ ते १५ वेळा मुंबईत येऊन गेले आहेत.

माझी नाळ ही महाराष्ट्राशी; खासकरून मुंबईशी जुळलेली आहे. यामुळे इथे बनणाऱ्या सरकारमध्ये आपलंही योगदान असावं मला वाटतं. मतदान ही केवळ आपली जबाबदारीच नाही; तर राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेतून मी दरवेळी आवर्जून मतदान करत असतो.
- धीरेन मोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT