Election and Wedding Season  sakal
मुंबई

Election and Wedding Season : मतदानाने साधलाय लगीनघाईचा मुहूर्त ; दोन महिन्यात अवघे १२ शुभ दिवस

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे या दिवशी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. याच काळात लग्नाचे मुहूर्त असल्याने मंडप, मंगल कार्यालये आणि केटरिंग व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे या दिवशी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. याच काळात लग्नाचे मुहूर्त असल्याने मंडप, मंगल कार्यालये आणि केटरिंग व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदान आणि मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या काळातच लग्नाचे मुहूर्त येत असल्याने नियोजित वधू-वरांच्या कुटुंबीयांवरसुद्धा बंधने आली आहेत. दरवर्षी मे महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त अधिक असतात.

जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीची कामे; तर शाळा, कॉलेज सुरू होत असल्याने पालकांची धावपळ असते. त्यामुळे मे महिन्यात अधिक लग्न असतात; मात्र यंदा मे महिन्यात दोनच मुहूर्त असून २९ जूनपर्यंत मुहूर्तच नाहीत. यामुळे एप्रिल महिन्यातील असलेल्या सर्वच तारखांना मंगल कार्यालये, बॅण्ड आदींची बुकिंग फुल्ल झाली असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, यापूर्वी लग्नाच्या तारखा काढलेल्या वधू व वर पित्यांनी मंगल कार्यालये आधीच बुक केली आहेत. मंगल कार्यालयात सर्व सुविधा मिळत असल्याने येथे लग्न करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे स्वयंवर मंगल कार्यालयाचे स्वप्नील सोनपावले यांनी सांगितले. दरम्यान, विवाह मुहूर्ताच्या तारखा पाहून बॅण्डदेखील बुक झाले आहेत. मार्च, एप्रिल महिन्यांतील लग्नाच्या सर्व तारखा बुक झाल्या असल्याचे मंगल कार्यालयातील व्यवस्थापकाने सांगितले.

नेहमीचाच पेच

दर पाच वर्षांनी लग्नसमारंभ आणि लोकसभा निवडणुका एकत्र येतात. आचारसंहिता लागू असल्याने आवाज आणि लग्न समारंभाच्या वेळेवर बंधने येत असल्याचे एका मंगल कार्यालय मालकांनी सांगितले. शिवाय निवडणूक आणि लग्नसराईच्या तारखा यांचा ताळमेळ व्यावसायिकांसह वधू-वराच्या कुटुंबीयांना साधावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT