wada 
मुंबई

पालघर - वाड्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद

सकाळवृत्तसेवा

वाडा (पालघर) : पालघर लोकसभेची निवडणूक आज होत असून मतदानाच्या दिवशी वाडा तालुक्यातीलअनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्र काही तास बंद राहिल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली. मशीन बंदमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  

वाडा तालुक्यात 44 मतदान केंद्रे आहेत. यापैकी खरीवली पौलबारे येथील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजता मतदान यंत्र बंद झाले त्यानंतर ते बारा वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आले. अशी माहिती केंद्राध्यक्ष उत्तम ठवरे यांनी दिली. बिलोशी मतदान केंद्रावरील मतदान यंत्र 9 वाजता बंद पडले ते 11 वाजता सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा हे मशीन काही काळ बंद पडले होते. अशी माहिती केंद्राध्यक्ष किरण देसाई यांनी दिली. देवघर येथील मतदान यंत्र 9 वाजून पाच मिनिटांनी बंद झाले होते ते अकरा वाजता सुरू करण्यात आले. खुटल व ब्राह्मणगाव येथील मतदान यंत्रही काही काळ बंद होते.  

मतदान यंत्रे बंद असल्याने मतदारांना काही काळ ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.या मतदान यंत्रे बंदमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saptashrungi Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता 24 तास घेता येणार सप्तश्रृंगी मातेचे दर्शन; पण 'या' एका नियमामुळे प्रवासात होणार मोठा बदल

युद्धामुळे खाद्यतेल महाग! इराण-इस्रायल संघर्षाची धग स्वयंपाकघरापर्यंत; तेल डब्यांचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आरटीईच्या प्रवेश अर्जासाठी तीन दिवसांची मुदत, उच्च न्यायालयाचा पालकांना मोठा दिलासा

Pune News: गॅस तुटवड्याची अफवा! नागरिकांनो गोंधळून जाऊ नका; पुरवठा सुरळीत असल्याची गॅस कंपन्या, वितरकांची माहिती..

Illegal Sand Transportation: अवैध वाळू वाहतुकीने घेतला जीव; सेलूत हायवा टिप्पर अपघातांमुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT