मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले नवमतदार.
मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले नवमतदार. 
मुंबई

मतदान मंदावले!

सकाळ वृत्तसेवा

पनवेल/ उरण   : १४ व्या विधानसभेसाठी सोमवारी पनवेल व उरण मतदारसंघात पार पडलेल्या लोकशाहीच्या महाउत्सवात निरुत्साह असल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी निवडणूक आयोगाने नवमतदारांपर्यंत पोहचून मतदारांच्या संख्येत वाढ केली असली तरी पनवेलमध्ये मतदान मंदावले असल्‍याचे चित्र दिसून आले. सकाळी ७ वाजता सुरू करण्यात आलेल्या मतदानप्रक्रियेत मतदान केंद्र आणि रांगा हे निवडणुकीतील नेहमीचे चित्र अपवादात्मक मतदान केंद्र वगळता फार कमी मतदान केंद्रांवर पाहायला मिळाले. त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवात, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीत मतदानाच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसून आले. 

राज्यात एकाच दिवशी घेण्यात आलेले मतदान, शाळांना लागलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या; तसेच शनिवार आणि रविवारी लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातील अनेक मतदार मतदानाचे कर्तव्य न बजावताच गावी निघून गेले. त्यामुळे पनवेलमधील निवडणुकांची टक्केवारी घसरल्याचे बोलले जात आहे. तसेच मतदारसंघात असलेल्या गैरसोईबाबत मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचादेखील परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असल्याची शक्‍यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. 

राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या पनवेल मतदारसंघात २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत  मतदारांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेतला होता. मात्र या निवडणूकित मतदारांच्या संख्येत वाढ झाली असली तरी मतदानाच्या टक्‍केवारीत घट झालेली दिसून आली आहे. उरणमध्ये उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. सहानंतर राहिलेल्‍या मतदारांना चिठ्या देण्यात आल्‍या होत्‍या. 

पनवेलमध्ये निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, याकरिता करण्यात आलेले प्रयत्न निष्फळ ठरले असल्याचे पाहायला मिळाले आहे.   

सेल्फी पॉईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू 
आयोगातर्फे पनवेल शहरातील व्ही. के. हायस्कूल येथे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात आले होते. मतदान केंद्राबाहेर आकर्षक रंगीबेरंगी फुग्यांची आरास करण्यासोबत मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी येणारे मतदार आकर्षित होत असल्याचे पाहायला मिळाले. 

यंत्रणेत ३ ठिकाणी बिघाड 
सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर तळोजा फेज- १ येथील मतदान यंत्र धीम्या गतीने चालत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने तत्काळ तेथील मतदानयंत्र बदलण्यात आले. तसेच काळुंद्रे बुथ क्रमांक ५४२ व खेरवाडी बुथ क्रमांक १६३ मधील मतदान यंत्रात बिघाड आल्याने दोन्ही ठिकाणचे मतदानयंत्र तत्काळ बदलण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT