Wadhavan
Wadhavan 
मुंबई

'वाधवा' बंधू सीबीआयच्या ताब्यात

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करणाऱ्या वाधवा बंधूंना अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ताब्यात घेतले. गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी वाधवा यांना दिलेल्या पत्राबाबत अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून चौकशीचा अहवाल सोमवारी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही महाराष्ट्रात वाधवा कुटुंबीयांना खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. वाधवा कुटुंबातील 24 जणांनी पाच गाड्यांमधून प्रवास केला होता. संबंधित व्यक्ती आपले आपले मित्र आहेत. त्यांना आपत्कालीन स्थितीत खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिल्याचे पत्र प्रधान सचिव अभिताभ गुप्ता यांनी दिले होते. 
लॉकडाऊनच्या काळातील आदेश तोडल्यानंतर वाधवा कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे 14 दिवस संपल्यानंतर धीरज व कपिल वाधवा यांना सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे. सातारा पोलिसांच्या मदतीने त्यांना मुंबईत आणण्याची कार्यवाही सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले

चौकशी अहवाल आज? 
सरकारी लेटरहेडवर शिफारसपत्र देणारे गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांची चौकशी करण्याचा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर चौकशी सुरू असेपर्यंत गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. चौकशीचा अहवाल सोमवारी मिळण्याची अपेक्षा आहे.
 

Wadhwan brothers traveling from Khandala to Mahabaleshwar in CBI custody

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT