मुंबई

महामुंबईच्या प्रवाशांची प्रतिक्षा संपणार? लवकरच सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू होण्याची शक्यता

तुषार सोनवणे

मुंबई - महामुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी लोकल ट्रेन कधी सुरू होणार असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. दिवाळी नंतर कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत होती. आता मुंबईकरांसाठी 15 डिसेंबर नंतर लोकल ट्रेन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी मुंबईची लोकल ट्रेन बंद करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु सर्वांसाठी लोकल प्रवास कधी सुरू होणार हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिवाळी नंतर कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे म्हटले होते.

दिवाळीत नागरिकांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे दिवाळी नंतर पुन्हा कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे 15 डिसेंबर पर्यंत कोरोना संसर्गाचा आकडा स्थिर राहिल्यास मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. सध्या मुंबईतील कोरोना संसर्गाचा आकडा जवळपास स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 15 डिसेंबर नंतर सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने लवकरच प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यासंबधीचा निर्णय 10 ते 12 डिसेंबरदरम्यानच्या महत्वाच्या बैठकीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांसाठी लोकल ट्रेनची प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे चिन्ह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Akola News: दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; रिधोरा शिवारातील खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Maharashtra Weather : पुढील ५ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा

Adani Defence News: लष्कराच्या भात्यात अदानी डिफेन्सची ‘प्रहार’; ‘मशिनगन’ची पहिली खेप सुपूर्त, ‘मेक इन इंडिया’ची कमाल

Latest Marathi News Live Update : जगावर खतटंचाईचे सावट

SCROLL FOR NEXT