मुंबई

ओल्या काजू बियांसाठी म्हणून थाेडे थांबा

सकाळ वृत्तसेवा

माणगाव (बातमीदार): ओले काजू म्हणजे अस्सल खवय्यांसाठी पर्वणी. दरवर्षी जानेवारीच्या सुरुवातीपासून त्याचा हंगाम सुरू होतो. यंदा त्यालाही लांबलेल्या पावसाचा फटका बसला असून बाजार थंड आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार या बिया तब्बल दीड महिना उशिराने बाजारात दाखल होतील, तसेच त्यांचे भावही चौपट वाढलेले असतील. 

कोकणातील फळ म्हणून काजूची ओळख आहे. काजूगराप्रमाणेच ओल्या काजूलाही बाजारात चांगली मागणी असते. गेल्या वर्षी 100 रुपयांत 100 बिया मिळत होत्या. त्यामुळे खवय्यांची चंगल झाली होती. यंदा लांबलेल्या पावसाने कडधान्य आणि काजूसारख्या उन्हाळी फळांना फटका बसला आहे. दक्षिण कोकणात सध्या 100 रुपयांत 15 बिया विकण्यात येत आहेत. या बियांसाठी प्रसिद्ध असलेल्या माणगावचा बाजार मात्र थंड आहे. 

ओला काजू आदिवासी महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार देतो. अनेक शेतकरी व आदिवासी कुटुंब त्याच्या विक्रीतून रोजीरोटी मिळवतात. या वर्षी मात्र काजूचा हंगाम उशिराने सुरू होणार असल्याने अनेक कुटुंबांचा हक्काचा व्यवसाय बुडत आहे. 

दरवर्षी जानेवारीच्या सुरुवातीस ओले काजूगर विक्रीसाठी उपलब्ध असतात. या वर्षी मोहोरच उशिरा आल्याने काजूगर तयार होण्यास उशीर होणार आहे. यामुळे दरवर्षी उपलब्ध होणारा रोजगार बुडाला आहे. 
- भीमा कोळी, काजू विक्रेती महिला, माणगाव. 


दक्षिण रायगडातील काजूगर स्वादिष्ट असतात. यंदा लांबलेल्या पावसाने त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
- मंगेश खडतर, पनवेल. 

ओल्या काजूचे जानेवारी अखेरीस चांगले उत्पादन सुरू होते. या वर्षी लांबलेला पाऊस यामुळे मोहोराची प्रक्रिया उशिराने सुरू झाली आहे. त्यामुळे एक ते दीड महिना उशिराने या बिया बाजारात येण्याची शक्‍यता आहे. 
- योगिता पतारे, तळा. 

लांबलेल्या पावसामुळे काजूला मोहोर येण्यास उशीर झाला. दरवर्षी जानेवारी महिन्यात बिया बाजारात येतात. या वर्षी पिकाचे नुकसान झाले असून जवळपास 50 टक्के उत्पादन कमी होईल. फेब्रुवारी महिन्यात काजूगर मिळण्यास सुरुवात होईल. 
- यतीन करडे, काजू बागायतदार, म्हसळा. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Weather Forecast : उत्तर भारतातील थंड हवेची लाट पुन्हा वाढली, अजून गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

SSC CGL Tier 1 Result 2025: SSC CGL टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर; पहा कुठे अन् कसा पाहायचा रिजल्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई नाशिक महामार्गावर बाईक अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT