local sakal
मुंबई

आसनगाव स्थानक होम प्लॅटफॉर्मच्या प्रतिक्षेत

आसनगाव, कसारा दिशेकडे येणाऱ्या लोकल वाढविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेवरील ग्रीन स्थानक म्हणून आसनगाव स्थानकाची ओळख आहे. मात्र, या स्थानकाला अद्याप होम प्लॅटफॉर्मच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे आसनगाव, कसारा या दिशेकडील ये-जा करणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढविण्यावर मर्यादा येतात. आसनगाव स्थानकाला होम प्लॅटफॉर्म म्हणून मंजुरी देऊन येथे तातडीने कामे करण्यास सुरुवात करावी. यासह तिसऱ्या मार्गिकेचे कामाचा वेग वाढविण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.

शहापूर तालुक्यात आता जनसंख्या वाढत आहे. त्यामुळे आसनगाव येथे गर्दीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येप्रमाणे लोकल फेऱ्या वाढविणे आवश्यक असतानाही तसे होत नाही. उत्तर भारतात जास्त संख्येने लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. परिणामी, कल्याण-कसारा तिसरी, चौथी मार्गिका बनविण्यावर भर दिला पाहिजे. यासह सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्यावेळी मेल,एक्सप्रेसऐवजी लोकलला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी तातडीने आसनगावला होम प्लॅटफॉर्म केले पाहिजे, अशी मागणी कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनचे कोषाध्यक्ष दिनेश घरत यांनी केली

आसनगाव येथील रेल्वे स्थानकाचे पूर्वीच्या कसारा दिशेकडील पादचारी पूल प्रवाशांसाठी खूप उपयुक्त होता. शहापूर तालुक्यातील विविध ठिकाणांहून हजारोंच्या संख्येने प्रवासी आसनगाव स्थानकातून प्रवास करतात. साधारणपणे 80 ते 85 टक्के प्रवासी या पुलाचा वापर करत होते. या प्रवाशासाठी हा पूल फायदेशीर होता. मात्र, हा पादचारी पूल 2018 साली मध्य रेल्वेकडून तोडण्यात आला. सध्या आसनगाव स्थानकाच्या मध्य भागी असलेल्या पादचारी पुलावर चढून तिकिट काढण्यासाठी पुन्हा मागे जावे लागले. यासाठी प्रवाशांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे. बॅगा, लहान मुले सांभाळून महिलांना येथून प्रवास करणे कठिण झाले आहे. यासोबत गरोदर महिला, वृद्ध प्रवासी यांना मध्यभागी असलेला पुलावरून प्रवास करणे किचकट होऊन बसले आहे. त्यामुळे कसारा दिशेकडील पादचारी पूल पुन्हा लवकरात लवकर उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्व आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT