mumbai sakal
मुंबई

ईडीची ठोस कारवाई मात्र सीआयडीची हाताची घडी!

मालमत्ता जप्तीनंतर ठेवीदारांना पैसे मिळण्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या (Karnala Nagari Sahakari Bank) ५४३ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी (In the case of financial scams) सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) (ED) नवी मुंबई (New Mumbai) आर्थिक गुन्हे शाखेकडे (Financial Crimes Branch) दाखल झालेल्या गुन्ह्यावरून विवेक पाटील यांना अटकेपासून (arrest) त्यांची २३४ कोटींची मालमत्ता जप्तीची (Property confiscation) कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात सीआयडीकडे (CID) गुन्हा वर्ग करण्यात आल्यापासून त्यांनी हाताची घडी बांधल्याने राज्य पोलिसांची (State Police) प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा खातेदारांमध्ये आहे.

ठेवीदारांच्या संघर्ष समितीने तसेच भाजपच्या पनवेल, उरण येथील आमदारांनी कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी ईडी आणि सीआयडीकडे समांतर कारवाईची मागणी केली होती. रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला आहे, परंतु ठेवीदार आपले पैसे कधी मिळतील या प्रतीक्षेत आहेत. काहींनी निवृत्तीनंतर आलेली भविष्य निर्वाह निधीतील पुंजी बँकेत मोठ्या विश्वासाने ठेवली होती. जमिनीचे पैसे मुलांच्या शिक्षणासह विवाहाकरिता गुंतवणूक केले होते; मात्र बँक घोटाळ्यामुळे अनेकांचे पैसे बुडाले. त्‍यात कोरोनाचा कहर झाल्‍याने ठेवीदारांना पैशांअभावी तणावग्रस्त जीवन जगावे लागले.

काहींची उसणवारी वाढली, काहींच्या घरची मंगलकार्ये रखडली; तर काहींना आर्थिक दारिद्र्याच्या खाईत जीवन जगावे लागत आहे. विवेक पाटील यांची मालमत्ता जप्त करून त्‍याचा लिलाव करण्यात येणार असून ही रक्‍कम ठेवीदारांना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT