Water in Water Purification Center Water supply cut off in parts of Kalyan mumbai esakal
मुंबई

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी; कल्याणच्या या भागांमधील पाणी पुरवठा बंद

उल्हास नदी काठी असलेल्या मोहिली येथील केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रात नदीचे पाणी शिरल्याने पाणी पुरवठा बंद केल्याने कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम च्या काही भागात पाणी पुरवठाला फटका बसला

रविंद्र खरात

कल्याण : उल्हास नदी काठी असलेल्या मोहिली येथील केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रात नदीचे पाणी शिरल्याने पाणी पुरवठा बंद केल्याने कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम च्या काही भागात पाणी पुरवठाला फटका बसला असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे . बारवी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने उल्हास नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून मोहिली येथील असलेल्या केडीएमसीचे जलशुद्धीकरण केंद्रात नदीचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला.

कल्याण पूर्व वालधुनी अशोक नगर परिसर आणि कल्याण पश्चिम मधील घोलपनगर , योगिधाम , मुरबाड रोड , रामबाग लेन 1 ते 6 , चिकन घर , सिंधिगेट , फॉरेस्ट कॉलनी , मिलिंद नगर , सह्यादी नगर , बिर्ला कॉलेज रोड ,भोईर वाड़ी , खडक पाडा सर्कल ,इंदिरा नगर , संतोषी माता रोड आदी परिसर मध्ये पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाणी पुरवठा सुरू झाल्या नंतर काही काळ गढूळ पाणी पुरवठा होण्याचा संभव असल्याने पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने केला आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate : चांदीचे दर थेट 11000 रुपयांनी घसरले! दोन दिवसांत 19 हजारची तूट; 'या' दोन कारणांमुळे आली मोठी मंदी, खरेदीसाठी बेस्ट संधी

6,4,6,4,6,4... सर्फराज खानच्या ३१० च्या स्ट्राईक रेटने धावा, झळकावले वेगवान अर्धशतक; श्रेयस अय्यरचीही दमदार खेळी, मुंबईची एका धावेने हार

मुरांबा मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; येतेय अक्षयची स्वरा, झी मराठीवरील 'ही' अभिनेत्री साकारतेय भूमिका

Old Phone Selling Tips: जुना फोन विकताय? 'या' 4 मोठ्या चुका केल्यास लाखोचा फटका बसेल!

Latest Maharashtra News Updates Live: ही निवडणूक मुंबईच्या संस्कृतीची आणि विकासाची आहे : आशिष शेलार

SCROLL FOR NEXT