water pollution  sakal
मुंबई

Water Pollution : उत्तरशिव नदीतील पाणी प्रदुषित, घातक रसायनामुळे नागरिकांच्या जीवाला धोका

सतत सुरू असणाऱ्या पावसाचा फायदा घेत काही भंगार माफियांनी रासायनिक द्रव्य नदीत सोडले गेले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण ग्रामीण मधील 14 गावांतून वाहणाऱ्या उत्तरशिव नदीच्या पाण्यावर सफेद रंगाचा तवंग आला आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पाण्याला फेसही येत आहे. नदीच्या पात्रात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे नदीचे पात्र दूषित झाले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

सतत सुरू असणाऱ्या पावसाचा फायदा घेत काही भंगार माफियांनी रासायनिक द्रव्य नदीत सोडले गेले आहे. यापूर्वी ही अनेकदा नदीच्या पाण्यात रसायन सोडले जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होऊन शेतीचे नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

उतरशिवाच्या नदीचा उगम हा ठाकूरपाडा डोंगरावरून झाल्या नंतर ती दहिसर-मोकाशी पाडा मार्गे उत्तरशिव नागाव नंतर देसाई खाडीला जाऊन मिळते. मात्र या नदीत सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनामुळे नागरिकांच्या आरोग्यासह जलचरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

कल्याण ग्रामीण भागातील 14 गावांमधून वाहणाऱ्या उत्तरशिवच्या नदीत रसायन युक्त पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. रविवारी सकाळ पासून सुरू असणाऱ्या पावसाचा फायदा घेत भंगार माफियांनी रसायन युक्त पाणी नदीत सोडल्याचे बोलले जात आहे. काल दुपारपासून नदीच्या पाण्याला फेस येत असून पाण्यावर सफेद रंगाचा तवंग देखील आला आहे.

उत्तरशिव नदीच्या किनारी शेतकरी शेती तसेच मासेमारी करत आपला उदरनिर्वाह करत आहेत. शेतात फळ भाज्यांची लागवड केली जाते तर पावसाळ्यात भाताचे पीक घेतले जाते. ग्रामीण भागात भंगाराची गोदामे मोठ्या प्रमाणात आहेत. या गोदामांमधून अनेकदा रासायनिक द्रव्य छुप्या पध्दतीने नदीत सोडले जातात.

यापूर्वी ही नदीच्या पाण्यात रसायन सोडले गेल्याने नदीच्या पाण्याला वेगवेगळे रंग व उग्र वास येत होता. याविषयी स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची भव्य मॉक ड्रिल; विविध यंत्रणांचा समन्वय आणि सज्जतेची यशस्वी चाचणी

Kamshet double murder case solved: कामशेतमधील दुहेरी खुनाचा उलगडा; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना अटक

SCROLL FOR NEXT