मुंबई

वालधुनी नदीचं पाणी होतयं केशरी

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर: डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) रोड विविध रंगांनी चर्चेचा विषय ठरलेला असतानाच अंबरनाथ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या पाण्याने वालधुनी नदीच्या पात्रात ऑरेंज तवंगाची दहशत पसरली आहे. दरम्यान, यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणती कारवाई करते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

वालधुनी नदीचा उगम मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मिल्ट्री तलावातून झाला. नदीच्या अंबरनाथ एमआयडीसीतून पुढे एका वृद्धाश्रमाच्या जवळून वाहणाऱ्या नदी पात्रात ऑरेंज तवंग सातत्याने दिसून येत आहे. पुढे या नदीत सांडपाणी मिसळत असल्याने पालेगाव, शिवमंदिर, उल्हासनगर, विठ्ठलवाडीमार्गे कल्याणपर्यंत नदीला गटाराचे स्वरूप आले आहे.

एकेकाळी या नदीत मासेमारी केली जात होती; मात्र केमिकल कंपन्यांचे रासायनिक पाणी आणि सांडपाण्यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आल्याने मासेमारीच इतिहासजमा झाली आहे. 

कंपन्यांकडून नोटिसा बेदखल 

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत सुमारे 40 कंपन्या असून त्यातील 12 ते 13 कंपन्या या रासायनिक केमिकलच्या आहेत. त्यातून हे ऑरेंज पाणी नदीच्या प्रवाहात समाविष्ट होते. वनशक्ती संघटनेचे अश्विन अघोर, वालधुनी जल संघटनेचे शशिकांत दायमा यांनी याबाबत तक्रारी केल्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या कंपन्यांना नोटिसादेखील बजावल्या होत्या; मात्र त्या बेदखल केल्या जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने काही वर्षांपूर्वी या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी स्थानिक महापालिका आणि एमआयडीसी यांना काही कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड तर भरला गेला नाहीच, उलट नदीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे आता या नदीकडे सरकारी यंत्रणा कधी लक्ष देतील? हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

web title : The water of the river Valdhuni is becoming saffron

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT