Mokhada water scarcity sakal media
मुंबई

मोखाड्यात टंचाईग्रस्त 39 गाव पाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा

भगवान खैरनार

मोखाडा : उन्हाची तिव्रता वाढू लागल्याने दिवसागणिक, मोखाड्यात टंचाई ग्रस्त गाव पाड्यांमध्ये (water scarcity in mokhada) वाढ होऊ लागली आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या  39 वर पोहोचली आहे. त्यांना 15 टॅंकरद्वारे शासनाने पाणी पुरवठा (water supply) सुरू केला आहे. नियमीत पावसाळा सुरू होण्यास अजून अडीच महिन्यांचा कालावधी बाकी आहे, तसेच प्रचंड ऊष्म्याने, पाण्याचा श्रोत आटु लागला आहे. परिणामी विहीरी कोरड्या (Dry well) पडु लागल्या आहेत. त्यामुळे टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. 

मोखाड्यात फेब्रुवारीत पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. मार्च महिण्यात टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या  30  पर्यंत झाली होती. मात्र, एप्रिल च्या पहिल्याच आठवड्यात ही संख्या  39  वर पोहोचली आहे. ऊन्हाच्या काहीलीने नागरीक त्रस्त झाले आहेत तर विहीरींचा नैसर्गिक पाण्याचा श्रोत आटु लागला आहे. त्यामुळे विहीरी कोरड्या पडु लागल्या आहेत. सध्यस्धितीत दापटी  1, दापटी  2, स्वामीनगर, कुंडाचापाडा, हेदवाडी, ठवळपाडा, गवरचरीपाडा, ठाकुरवाडी, नावळ्याचापाडा, शास्त्रीनगर, कुडवा या गावपाड्यांसह टंचाई ग्रस्त  39  गावपाड्यांना  15  टॅंकरद्वारे, शासनाने पाणी पुरवठा सुरू केला आहे. 

ऊन्हाची तिव्रता आणि प्रचंड ऊष्मा असाच राहीला तर गतसालच्या  87  टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या मागे टाकत त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन ऊन्हाच्या काहीलीत, टॅंकर चे पाणी विहीरीत टाकताच, ते भरण्यासाठी टंचाई ग्रस्त गाव पाड्यांतील नागरीक विहीरीवर गर्दी करत असल्याचे  चित्र सर्वत्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; निफ्टी 70 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

Indian Army Kupwara Encounter : नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली; लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दल सतर्क

Ind Vs Aus ODI : भारताविरुद्ध मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! सलामीवीर फलंदाजासह फिरकीपटू संघातून बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Live Update : महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT