file photo 
मुंबई

पश्‍चिम मुंबईतील पाणीटंचाई संपणार 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : साताक्रूझ पूर्व, वांद्रे पश्‍चिम आणि अंधेरी पूर्व भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी तेथील जलवाहिन्या बदलण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. सुमारे 3 कोटी 70 लाख रुपयांच्या या कामाला लवकरच पालिकेची मंजुरीही मिळणार आहे. या कामांमुळे दूषीत पाणीपुरवठा; तसेच या भागातील पाणीटंचाईवर मात होणार आहे. मंजुरी मिळाल्यास लवकरच कामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

हे ही वाचा....महाराष्ट्राची ऐतिहासिक उपेक्षा 

सांताक्रूझ पूर्व, अंधेरी पूर्व आणि वांद्रे पश्‍चिम या भागात मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याची समस्या भेडसावत असून येथील अनेक भागात तीव्र पाणीटंचाईसुद्धा जाणवत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 150 मिलिमीटर ते 900 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्या या भागात टाकण्यात येणार आहेत. वांद्रे पूर्व वाकोला नाला येथील दुर्गामाता मंदिराजवळ श्रीहरी मंदिर रस्त्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील झोपडपट्टीला पुरेसे पाणी मिळावे यासाठी येथे 600 बाय 450 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. 


मे. बुकॉन इंजिनिअर्स आणि इन्फ्रास्ट्रक्‍चर्स प्रायव्हेट लिमिटेड या एकमेव निविदाकाराने या कामासाठी निविदा भरली आहे. या कामात येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि कठीण खडकात करायचे खोदकाम या कामामुळे 3 कोटी 70 लाख रुपये इतक्‍या रकमेवर काम करण्यास कंत्राटदाराने सहमती दर्शविली आहे. 

दूषित पाण्याच्या तक्रारी 
दूषित पाण्याच्या तक्रारी या भागात वाढल्या होत्या. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला तरी पाण्याची टंचाई का, असा सवाल स्थानिक करू लागले होते. नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी आता जलवाहिन्याच बदलण्याचा कार्यक्रम पालिकेच्या जलअभियंता विभागाने हाती घेतल्याने स्थानिकांना पालिकेने मोठा दिलासा दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

Pune Fraud : अघोरी विधीच्या नावाखाली पुण्यात तरुणीची सव्वातीन लाखांची फसवणूक

Latest Marathi News Updates Live: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला

SCROLL FOR NEXT