मुंबई

कल्याण डोंबिवलीचा शुक्रवारी पाणी पुरवठा बंद

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी २४ तासांचा शटडाऊन शुक्रवारी (ता. २४) घेण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या वतीने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीवरील देखभाल व दुरुस्तीचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा, असे पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

Raj Thackeray : जिथे जाल तिथे मराठीतच बोला; राज ठाकरे यांनी मांडला 'स्वप्नातील महाराष्ट्र'

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

SCROLL FOR NEXT