mumbai municipal corporation sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईतील या भागातील जलवाहिन्या बदलणार; पालिका करणार १3 कोटी रुपये खर्च

वेरावली जलाशयच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - वेरावली जलाशयच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. १२०० मिमी व्यासाच्या जल वाहिन्या बदलून त्याजागी १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यामुळे अंधेरी पूर्व व पश्चिम व जोगेश्वरीतील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाने व्यक्त केला आहे. या जलवाहिन्या बदलण्यासाठी तब्बल १३ कोटी ८८ लाख रुपये येईल अशी माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली.

या जलाशयाच्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून त्या जीर्ण झाल्याने आहेत. त्यामुळे त्या बदलून नव्या टाकण्याचे काम पालिकेच्या जल विभागाने हाती घेतले आहे. पूर्व उपनगरात नवीन जल वाहिन्या टाकण्यासाठी ९० कोटींच्या निविदा मागवल्या असून पूर्व उपनगरापाठोपाठ पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जल वाहिन्या टाकण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

पश्चिम उपनगरातील विविध भागात जुन्या जल वाहिन्या बदलून नव्या टाकण्याचे काम पालिकेच्या जलअभियंता विभागाच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. वेरावली जलाशय व्ही २ पर्यंत १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी पाणीपुरवठा होतो. या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी ४० फूट खोल अंतरावर असून जल वाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने पाणी वाया जाते.

पाणी गळती रोखण्यासह अंधेरी येथील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी वेरावली जलाशय येथे १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

जलहिनीची क्षमता वाढविल्यास अंधेरी पूर्व व पश्चिम, जोगेश्वरी या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, तसेच या विभागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, असा विश्वास जल अभियंता विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT