मुंबई

लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल डॉ. संजय ओक यांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळवृत्तसेवा

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातला आहे. त्यामध्येच आता कोरोनाचा नवा प्रकार आला आहे. हा विषाणून वेगाने पसरत असून त्याचा संसर्ग लहान मुलांमध्ये अधिक होत आहे. त्यामुळेच १० वर्षांवरील लहान मुलांचे लसीकरण करणे गरजेचं आहे, असं वक्तव्य राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी केलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. सध्या राज्यात जवळपास ९० हजार मुलांना या संसर्गाची बाधा झाली आहे. यात काही चिमुकल्यांना त्यांचे प्राणदेखील गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असतांना तिसरी लाट येण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांची अधिक काळजी  घ्यावी लागणार आहे. 

"10 वर्षावरील लहान मुलांचं लसीकरण करावं लागणार आहे. हे लसीकरण या वर्षाच्या तिसऱ्या सत्रात पूर्ण करावे लागेल. आपल्याकडे सध्या कोव्हीशिल्ड आणि को व्हॅक्सीन या दोन लस वापरल्या जात आहेत. या दोन लशी लहान मुलांना देणे योग्य आहेत का? याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. मात्र इंग्लंड मध्ये फायझर आणि मॉर्डना या लसी लहान मुलांसाठी वापरल्या जात आहेत, त्याचा विचार आपण करायला हवा" असे डॉ ओक यांनी सांगितले. "

दरम्यान,राज्यात 10 वर्षाच्या आतील लहान मुलांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत 91,054 लहान मुलं कोरोना संसर्गाने बाधित झाले आहेत. लहान मुलांच्या बाधित होण्याचे प्रमाण हे 3.12 वर पोहोचले आहे.तर 11 ते 20 वयोगटातील 1,93,253 तरुण मुलं बाधित झाले असून त्याचे प्रमाण 6.62 टक्के  आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT