Farooq Abdullah 
मुंबई

Farooq Abdullah: प्रभू श्रीराम केवळ हिंदुंचेच का? ते सर्वांचेच; अब्दुल्ला यांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देशात काश्मीर राहिलं, त्यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचं योगदान मोठ असल्याचं म्हटलं. तसेच अब्दुल्ला कुटुंबाची संपूर्ण निष्ठा कायम भारताच्या ऐक्याशी राहिलेली आहे, असंही पवार यांनी म्हटलं. पवार यांच्या गौरवोद्गारानंतर अब्दुल्ला यांनी भारताविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. (Farooq Abdullah news in Marathi)

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भारताला काँग्रेसच्या धर्तीवर जोडण्याबाबत विधान केलं. अब्दुल्ला म्हणाले, 'मी मुस्लिम आहे, पण चिनी मुस्लिम नाही. मी भारतीय मुस्लिम आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताला जोडून ठेवायचे आहे. आपल्याला भारताला एकत्र करायचे आहे. आपण सगळे वेगळे आहोत, पण आपण एकत्र येऊनच भारत घडवू शकतो. कारण धर्म एकमेकांशी वैर ठेवायला शिकवत नाही. हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा, असंही अब्दुल्ला म्हणाले.

फारुख अब्दुल्ला पुढं म्हणाले की, धर्म भिन्न आहेत, पण ते आपल्याला एकत्र करतात. प्रभू राम फक्त हिंदूंचेच का? ते ब्रिटिश आणि रशियन लोकांचेही देव आहेत. पण प्रत्येकाला वेगळे केले जात आहे. जो सर्वांचा आहे, त्याच्यासमोर आम्ही मशिदीत जाऊन नमाज अदा करतो? असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं.

छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भुजबळ यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला फारुख अब्दुल्ला देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT