Ajit pawar Google
मुंबई

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध - अजित पवार

पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची तयारी

दीनानाथ परब

मुंबई: "मराठा आरक्षणाबद्दल (maratha reservation) शेवटी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय. धक्का देणारा, अशा पद्धतीचा हा निकाल आहे" असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (ajit pawar) म्हणाले. "राज्य सरकार इतर कोणत्याही वर्गावर अन्याय होऊ न देता आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे" असे अजित पवार यांनी सांगितले. (We are committed to give reservation to maratha community ajit pawar)

"पुढच्या अधिवेशनात किंवा एकदिवसाचं अधिवेशन बोलवायचं असेल, तर एकदिवसाचं अधिवेशन बोलवू. कोरोनाचं हे सावट संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षाला विश्वासात घेऊन पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ नेण्याची महाविकास आघाडीने मानसिकता ठेवली आहे" असे अजित पवार यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा रद्द केला. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजीची भावना आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे मराठा आरक्षणाचा विषय मोदी सरकारच्या अख्त्यारीत येतो, असे सत्ताधारी ठाकरे सरकारचे म्हणणे आहे. त्यावर विरोधी पक्ष भाजपा, सत्ताधारी महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मराठा आरक्षणाची बाजू मांडली नाही, असा आरोप भाजपाने केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT