We are not Godse wale but Gandhi wale Nana Patole changed his stant on Akshay kumar and Amitabh Bacchan 
मुंबई

"आम्ही गोडसेवाले नाही, गांधीवाले आहोत"; अक्षयकुमार, बिगबींबाबत पटोलेंची बदलली भूमिका 

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेते अक्षयकुमार आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता सौम्य भूमिका घेतली आहे. आधी या दोघांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर आता "आम्ही गोडसेवाले नाही तर गांधीवाले आहोत," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

पटोले म्हणाले, "मी अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात बोललो नव्हतो तर त्यांच्या कामाबाबत बोललो होतो. ते खरे हिरो नाहीत. त्यांनी जनतेच्या त्रासाबद्दल भाष्य करणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांना फक्त 'कागदी वाघ' बनून रहायचं असेल तर माझी हरकत नाही" 

या दोन कलाकारांना विरोध करताना पटोले पुढे म्हणाले, "आम्ही आमचं पाऊल मागे घेणार नाही पण जेव्हा जेव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील किंवा ते स्वतः आम्हाला दिसतील आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही त्यांच्याविरोधात संविधानिक मार्गानं आंदोलन करु कारण आम्ही गोडसेवाले नाही तर गांधीवाले आहोत." 

दरम्यान, मनमोहन सिंग सरकारच्या काळात ट्विटरच्या माध्यमातून कायम सरकारवर टीका करणारे अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन आता डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ होत असताना गप्प का आहेत? असा सवाल केला होता. तसेच या दोन्ही कलाकारांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात बंद पाडू असा इशाराही पटोले यांनी दिला होता. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT